व्हिएतनामच्या किनाऱ्यावर नव्या सागरी जीवाचा शोध
व्हिएतनाममध्ये वैज्ञानिकांनी एका नव्या सागरी जीवाची ओळख पटविली आहे. प्रारंभिक माहितीनुसार खोल समुद्रात राहणाऱ्या या जीवाला बाथिनोसम वेडेरी नावाने ओळखले जाते. याचे शीर प्रतिष्ठित ‘स्टार वॉर्स’ खलनायक डार्थ वेडरकडून परिधान करण्यात येणाऱ्या हेल्मेटशी मिळतेजुळते असल्याने संशोधकांनी याचे नाव हे ठेवले आहे. जूकीज नियतकालिकात या नव्या प्रजातीबद्दल लेख प्रकाशित करण्यात आला. बाथिनोसम वेडेरीच्या संरचनेचे काही घटक दक्षिण चीन समुद्रात आढळून येणाऱ्या अन्य बाथिनोसम नमुन्यांपेक्षा खूपच वेगळे असल्याची पुष्टी यात देण्यात आली. बाथिनोमस वेडेरी समवेत सुपरजायंट सागरी किडे, आयसोपोड परिवाराचे सदस्य आहेत. त्यांचे वैशिष्ट्या त्यांचे कठोर, सुरक्षात्मक एक्सोस्केलेटन आणि सात जोडी पाय आहेत.
त्यांच्याविषयी अध्ययन केल्यावर संशोधकांना सर्वात मोठ्या नमुन्याचे वजन 1 किलोग्रॅमहून अधिक असल्याचे आढळून आले आणि याची लांबी 32.5 सेंटीमीटर होती. बाथिनोसम क्रस्टेशियन्सची समग्र शारीरिक संरचना अनेक सिरोलानिड्स-आइसोपोड परिवाराशी संबंधित आहे. हे खोल समुद्रातील जीव अत्यंत मोठे झाले आहेत, असे अध्ययनाचे सहलेखक डॉ. कोनी सिदाबालोक यांनी म्हटले आहे. बहुतांश आयसोपोड अविश्वसनीय स्वरुपात छोटे असतात, ज्याची लांबी सर्वसाधारणपणे 2.5 सेंटीमीटरपेक्षा कमी असते. आकारातील ही असामनता अशाप्रकारच्या विशाल नमुन्याच्या शोधाला विशेष स्वरुपात उल्लेखनीय करते, असे कॅलिफोर्निया विद्यापीठातील सागरी जीवशास्त्राचे प्राध्यापक डॉ. लन्ना चेंग यांनी म्हटले आहे.
कुठे आढळते ही प्रजाती
बाथिनोसम वेडेरीला पकडणारे मच्छिमार दक्षिण-मध्य व्हिएतनामच्या क्वी नॉन शहरापासून सुमारे 50 सागरी मैल अंतरावर दक्षिण चीन समुद्रात मासेमारी करत होते. हा भाग स्प्रॅटली बेटसमुहाच्या पश्चिम दिशेला आहे. बाथिनोसम वेडेरी खोल समुद्रात राहणारा जीव असून तो मृत जीवांना खात असतो. खोल समुद्राच्या खाद्यसाखळीच्या हिस्स्याच्या स्वरुपात पोषक घटकांना पुनर्चक्रित करतो. बाथिनोमसचा विशाल आकार सागराच्या खोलीत त्याच्या जिवंत राहण्याला मदत करू शकतो. वर्तमानात अध्ययनानुसार केवळ 11 ज्ञात सुपरजायंट आणि 9 विशाल बाथिनोसम प्रजाती आहेत. बाथिनोसम वेडेरी दक्षिण चीन समुद्रात शोधण्यात आलेली दुसरी नोंद सुपरजायंट आयसोपॉड प्रजाती असल्याचे अध्ययनात सामील सिदाबालोक यांनी सांगितले आहे.
कशी असते संरचना
अन्य नोंद करण्यात आलेल्या सुपरजायंट आइसोपोड्सच्या उलट बाथिनोमस वेडेरीत एक अनोखे वैशिष्ट्या आहे. याच्या मागील पायांची अखेरची जोडी मागच्या बाजूला वळलेली असते. बाथिनोमस स्वत:च्या मंद प्रजननासाठी ओळखले जातात. हे सुपरजायंट क्रस्टेशियन अत्यंत कमी संख्येत अंडी देत असतात. हा मंद प्रजननदर त्यांना विशेषकरून अत्याधिक मासेमारीसाठी असुरक्षित करत असतो.