नवी किया कॅरेन्स क्लेवीस लाँच
11 लाखापासून किंमत सुरु : बुकिंगला सुरुवात
वृत्तसंस्था/ चेन्नाई
दक्षिण कोरियन कंपनी किया इंडियाने आपली नवी किया कॅरेन्स क्लेवीस ही चारचाकी गाडी भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. एमपीव्ही गटामध्ये सादर करण्यात आलेली ही गाडी अनेक वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आली आहे.
सदरच्या कारच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे. 9 मे पासून कार बुकिंगला सुरुवात झाली असून नव्या कारसाठी ग्राहकांना 25 हजार रुपये आगाऊ भरून आपली नवी गाडी बुक करता येणार आहे. गाडीच किंमत 11 लाखपासून सुरु होणार असून 21 लाखापर्यंत किमत असणार असल्याचे समजते.
या असणार सुविधा
या कारमध्ये डिजिटल टायगर फेसचे नवे वर्जन असणार असून समोरून आणि मागून कारचे डिझाईन खूपच आकर्षक करण्यात आले आहे. एलईडी डीआरएल, एलईडी आईस क्यूब हेडलाईटस, पॅनोरमिक सनरुफ, 26.62 इंचाचे ड्युअल स्क्रीन, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, अॅम्बीयंट लाइटिंग, 360 डिग्री कॅमेरा अशी आधुनिक खास वैशिष्ट्यो या गाडीमध्ये देण्यात आली आहेत.
सुरक्षिततेची वैशिष्ट्यो
सुरक्षिततेची बरीचशी वैशिष्ट्यो या गाडीत समाविष्ट केली असून यामध्ये एअर बॅग्ज, इएससी, एबीएस, इबीडी यासह एकूण 30 सुरक्षा वैशिष्ट्यो दिलेली आहेत. 1.5लिटर क्षमतेच्या पेट्रोल आणि तेवढ्याच क्षमतेच्या टर्बो पेट्रोल व डिझेल इंजिनसह ही गाडी सादर करण्यात आली आहे.