For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

नवीन इन्ट्रा व्ही 70 पिकअप, इन्ट्रा व्ही20 गोल्ड पिकअप आणि एस एचटी लाँच

07:00 AM Dec 08, 2023 IST | Tarun Bharat Portal
नवीन इन्ट्रा व्ही 70 पिकअप  इन्ट्रा व्ही20 गोल्ड पिकअप आणि एस एचटी लाँच

मुंबई : टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने सुरूवातीपासून शेवटच्या अंतरापर्यंतचे परिवहन अधिक कार्यक्षम करण्याप्रती आपल्या कटिबद्धतेशी बांधील राहत नवीन इन्ट्रा व्ही70, इन्ट्रा व्ही20 गोल्ड आणि एस एचटीच्या लाँचची घोषणा केली. ही नवीन वाहने उत्तम उत्पन्नासह लांबच्या अंतरापर्यंत जास्त पेलोड वाहून नेण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहेत. दर्जात्मक वैशिष्ट्यांनी युक्त ही वाहने विविध उपयोजनांसाठी वापरता येऊ शकतात, ज्यामधून भारतातील शहरी व ग्रामीण भागांमधून उच्च फायदे व उत्पादकता मिळेल. टाटा मोटर्सने  इन्ट्रा व्ही50 आणि एस डिझेलचे सुधारित व्हर्जन्स देखील लाँच केले, जे मालकीहक्काचा खर्च कमी करण्यासह इंधनाचा वापर कमी करण्यासाठी नव्याने डिझाइन करण्यात आले आहे. या नवीन लाँचसह टाटा मोटर्स लहान व्यावसायिक वाहने व पिकअप्सची व्यापक श्रेणी देते, ज्यामुळे ग्राहक त्यांच्या आवश्यकतांनुसार सर्वात सानुकूल वाहनाची निवड करू शकतात. या वाहनांसाठी बुकिंग्ज देशभरातील सर्व टाटा मोटर्स सीव्ही डिलरशिप्समध्ये सुरू आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.