दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे नवे मार्ग रडारवर
लवकरच होणार कारवाई
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये एलओसीवर असलेले दहशतवाद्यांच्या घुसखोरीयच नव्या मार्गांवर सुरक्षा दलांना स्वत:ची सुरक्षा, इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलान्स सिस्टीम मजबूत करण्यासोबत पिन पॉइंट ऑपरेशन करण्याचे थेट निर्देश देण्यातआले आहेत. गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार एका उच्चस्तरीय बैठकीत सीमावर्ती भागातील वरिष्ट अधिकाऱ्यांची ज्यात पंजाब पोलीस, जम्मू-काश्मीर पोलीस, बीएसएफ, सीआरपीएफ, सैन्यासमवेत समवेत सर्व गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आहे.
या बेठकीत दहशतवाद्यांच्या विरोधात मोठ्या मोहिमेवरून चर्चा झाली आहे. याचबरोबर घनदाट जंगलांमध्ये दहशतवाद्यांनी निर्माण केलेले मार्ग संपविण्याची योजनाही तयार करण्यात आली. दहशतवादी घुसखोरीसाठी नव्या मार्गांचा वापर करत आहेत. जम्मू-काश्मीरच्या राजौरी पुंछच्या पर्वतीय भगात नैसर्गिक स्वरुपात निर्मित अनेक मार्ग असून त्याद्वारे दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे समोर आले आहे.
अनेक मार्ग अस्तित्वात
स्थानिक ओव्हर ग्राउंड वर्करची मदत आणि पाकिस्तानी सैन्य तसेच रेंजर्सच्या सहाय्यामुळे दहशतवादी घुसखोरी करू शकतात. याचबरोबर जम्मू क्षेत्रात 13 छोटे नाले आणि 3 नद्या आहेत. या मार्गांचा वापर दहशतवादी घुसखोरीसाठी करतात. सुरक्षा दल या भागांमध्ये दक्ष राहत असले तरीही येथून दहशतवाद्यांना घुसखोरी करणे तुलनेत सोपे ठरते.
पर्वतीय मार्गाचा वापर
जम्मू क्षेत्रात घुसखोरी करण्यासाठी दहशतवादी पर्वतीय भागांमधील रस्त्यांचा वापर करतात. जम्मू क्षेत्रात घुसखोरी करण्यासाठी दहशतवादी पर्वतीय भगांमधील जुन्या मार्गांचा वापर करत पर्वतांमध्ये असलेल्या गुहांमध्ये आश्रय घेतात. याचबरोबर 13 नाल्यांमध्ये पावसाळ्यात पाणी भरते, या नाल्यांमधूनही दहशतवादी घुसखोरी करू पाहत असतात.
अनेक लाँचिंग पॅड
जम्मू क्षेत्राच्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या पलिकडे 4 दहशतवादी लाँच पॅड आहेत, तेथून जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी घुसखोरी करतात. सूत्रांनुसार आयएसआयने जम्मू क्षेत्रात सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यासाठी जम्मूच्या आंतरराष्ट्रीय सीमेच्या पलिकडे 4 लाँच पॅडला पुन्हा सक्रीय केले आहे. मसरूर, बडाभाई, चपराल लूनी आणि शकरगढ हे चार लाँच पॅड आहेत. अलिकडे ज्या प्रकारे दक्षिण पीर पंजालपासून राजौरी आणि पुंछ, किश्तवाड, रियासी, डोडा आणि कथुआमध्ये सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांनी केलेले हल्ले पाहता या भागातील मार्गांचा वापर करत दहशतवादी घुसखोरी करू शकतात असे मानले जात आहे. याचमुळे सुरक्षा दलांनी या भागांमधील स्वत:ची दक्षता वाढविली आहे.
नव्या मार्गांचा वापर
दहशतवादी कुठल्या मार्गावरून घुसखोरी करू शकतात यासंबंधी माहिती मिळवत सुरक्षा दलांनी स्वत:चा पहारा वाढविला आहे. गुप्तचरांनुसार दहशतवाद्यांकडून घुसखोरीसाठी पीओकेच्या नवया मार्गांचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये सीमापार पीओकेच्या 3 लाँच पॅड्सद्वारे (लोसार कॉम्प्लेक्स, सोनार, सरदारी) दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणण्याचा प्रयत्न पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयने चालविला आहे. नौशेरा नार, गोविंद नाला, परिबाल फॉरेस्ट यासारख्या मार्गांवरून घुसखोरी घडवून आणण्याचा आयएसआयचा प्रयत्न आहे. याचबरोबर माछिल सेक्टरच्या सरदारी, केल आणि तेजिनच्या लाँड पॅड्सवरून दहशतवादी रिंग पेन, कुमकारी गलीच्या मार्गे जम्मू-काश्मीरमध्ये घुसू शकतात. गुप्तचर यंत्रणांनी अहवाल सरकारला सादर केला आहे. केरन सेक्टरसमोर दुधनियाल, अठमुगम लाँच पॅडमध्ये विदेशी म्हणजेच अफगाणिस्तानात लढून आलेले दहशतवादी पोहोचले आहेत. पाकिस्तान या दहशतवाद्यांना नव्याने शोधण्यात आलेल्या मार्गाद्वारे भारतात घुसवू पाहत आहे.
हिमवृष्टीपूर्वी घुसखोरीचा प्रयत्न
सप्टेंबरपासून ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये पर्वतीय भागांमध्ये हिमवृष्टी तीव्र होते. हिमवृष्टीवेळी दहशतवाद्यांना घुसखोरी करणे अवघड ठरते. याचमुळे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय जम्मूमध्ये हिमवृष्टी होण्यापूर्वी मोठ्या संख्येत दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणू पाहत आहे.