नवी हिरो डेस्टिनी 125 लाँच
किंमत 80,450 पासून सुरु : होंडा अॅक्टिव्हा 125 सोबत टक्कर
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
हिरोमोटो कॉर्पकडून भारतीय बाजारात न्यू जनरेशन डेस्टिनी 125 स्कूटर लाँच करण्यात आली आहे. सुधारीत स्कूटरमध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट, लांब सीट आणि नवीन इंजिन देण्यात आले आहे. दरम्यान कंपनीने दावा केला आहे, की सदरची स्कूटर ही एक लिटर पेट्रोलमध्ये जवळपास 59 किमीचे अंतर धावणार आहे. या व्यतिरिक्त हिरो डेस्टिनी 125 मध्ये नवीन फिचर्स देण्यात आली आहेत. स्कूटरमध्ये तीन मॉडेल्स बाजारात आणली आहेत. यात व्हीएक्स, झेडएक्स आणि झेडएक्स प्लस यांचा समावेश आहे. या गाडीची सुरुवातीची किंमत 80,450 रुपये एक्स शोरुम राहणार आहे. नवीन स्कूटर 125 सीसी सेगमेंटमध्ये सुझुकी अॅक्सेस 125, टीव्हीएस ज्युपिटर 125 आणि होंडा अॅक्टिव्हा 125 यांना टक्कर देणार आहे. व्हीएक्स मॉडेल्स तीन कलरमध्ये उपलब्ध होणार आहे. यामध्ये व्हाईट, रीगल ब्लॅक अगाणि ग्रूव्ही रेड तसेच, झेडएक्स मॉडेल दोन कलरमध्ये राहणार आहे. तर झेडएक्स प्लस कॉपर क्रोम एक्सेट सोबत येणार आहे.