नवीन वर्ष साजरे करण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी होणार -मुख्यमंत्री बोम्मई
कोरोनाचा नवा व्हेरियंटप्रसारित होण्यापासून रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या बैठकीत सर्व राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले की, केंद्र सरकारने दिलेल्या उपाययोजनांबाबत कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर आणि मंत्री आर. अशोक यांच्यासोबत बैठक होणार आहे.
पुढे ते म्हणाले, राज्य सरकारने कोरोनावर नियंत्रण ठेवण्यापूर्वी खबरदारी घेतली आहे. बूस्टर डोस देण्यासाठी प्रभावी पावले उचलली जात आहेत. तालुका व जिल्हास्तरावर शिबिरे आयोजित करून बुस्टर डोस द्यावा. ILI तसेच सर्व चाचण्या अनिवार्य आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे आवश्यक आहे.
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची काळजी करण्याची गरज नाही. त्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करून महसूलमंत्री नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करतील. अशी माहिती यावेळी देण्यात आली.