सौदी अरेबियात नवीन ग्रँड मुफ्ती
शेख सालेह बिन फौजान अल-फौजान यांची नियुक्ती
वृत्तसंस्था/कतार
शेख सालेह बिन फौजान अल-फौजान यांची सौदी अरेबियाचे नवे ग्रँड मुफ्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 90 वर्षीय शेख सालेह यांची सौदी राजे सलमान यांचे पुत्र आणि क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या शिफारशीवरून नियुक्ती करण्यात आली. पंचवीस वर्षे ग्रँड मुफ्तीचे पद भूषवलेल्या शेख अब्दुल अजीज बिन अब्दुल्ला अल-शेख यांच्या मृत्यूनंतर शेख सालेह यांनी हे पद स्वीकारले. दोघेही अल-शेख कुटुंबाचे वंशज आहेत. ग्रँड मुफ्ती हे पद सुन्नी मुस्लीम जगतातील सर्वोच्च इस्लामिक पदांपैकी एक आहे. सौदी अरेबियामध्ये मक्का आणि मदीना ही पवित्र शहरे असल्याने ग्रँड मुफ्तींच्या विधानांवर जगभरात बारकाईने लक्ष ठेवले जाते. शेख अब्दुल अजीज बिन अब्दुल्ला अल-शेख यांचे सप्टेंबर 2025 मध्ये निधन झाल्यापासून हे पद रिक्त होते.