महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टेंबलाई टेकडीवर आकार घेतोय नवा गरुड मंडप

04:52 PM Jan 06, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement

फेब्रुवारीत उभारतोय अंबाबाई मंदिरात पूर्वी सारखाच नवा आकर्षक मंडप
सागवानी लाकडाचा मंडप साकारण्यासाठी कर्मचारी घेताहेत परीश्रम, खांब, छत, कडीपाटाचे काम पूर्ण, किड रोखण्यासाठी अॅण्टी टरमाईट केमिकलचा वापर, टेस्टिंगसाठी लॅबोरेटरीकडे पाठवले लाकडाचे भाग, लॅब सांगणार लाकडाचे आयुष्यमान
कोल्हापूरः संग्राम काटकर

Advertisement

अंबाबाई मंदिरात उभारण्यात येणारा आणि नक्षीकलेचा नमुना असलेला नवा गरूड मंडप टेंबलाई टेकडीवरील एका शेडमध्ये आकार घेऊ लागला आहे. त्यासाठी 22 कारागीर परिश्रम घेत आहेत. त्यांनी मंडपाच्या निर्मितीसाठी वापरण्यात येत असलेल्या सागवानी लाकडाचे कटिंग करून खांब, छतासह कडिपाटा तयार केला आहे. पूर्वीच्या गरूड मंडपाच्या लुकमध्ये आणि सध्या बनवल्या जात असलेल्या गरूड मंडप लुकमध्ये फरक दिसू नये यासाठी पुरातत्व विभाग गाईड लाईन देत आहे. जानेवारी अखेरपर्यंत मंडपाच्या भागांच्या निर्मितीचे काम पूर्ण कऊन मंदिरात फेब्रुवारी महिन्यात पूर्वीसारखाच नवा गरूड मंडप उभारण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यामुळे येत्या काहीच दिवसात ऊबाबदार गरूड मंडप उभारल्याचे भाविकांना पहायला मिळणार आहे.
करवीर संस्थानचे छत्रपती तिसरे शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीत (सन 1838 ते 1845) अंबाबाईच्या मंदिरात सागवानी लाकडापासून नक्षीदार गरूड मंडप उभारला गेला. 44 खांबांचा असलेल्या मंडपाच्या डोलारा चार वर्षापूर्वी दूरवस्थेत असल्याचे आणि खांब सडल्याचे दिसून आले. सडलेल्या खांबामुळे मंडप कोसळू नये म्हणून खांबांना लोखंडी पट्टे व दगडाने ठेप्या दिला. बरिच महिने ठेप्या कायम होता. दरम्यानच्या काळात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने स्वनिधीतून गरूड मंडप उतरवून घेतला आणि पूर्वी जसा होता, तसाच नवा उभारण्यासाठी शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे पाठपुरावा केला. परंतू विभागाकडून हिरवाकंदील दाखवण्यात थोडी दिरंगाई झाली. लोकसभा निवडणूकीची आचार संहिता लागू होण्याच्या आदल्याच दिवशी मात्र नवा गरूड मंडप तयार करण्यास शासनाच्या विधी व न्याय विभागाने मंजुरी देऊन टाकली. पुरातत्व विभागाने नेमलेल्या ठेकेदार व आर्किटेक्ट यांच्याकडे देवस्थान समितीने गऊड मंडपाचे काम सोपवून 18 महिन्यांमध्ये गरूड मंडप उभारण्यासाठी मुदत दिली. मंडप उतरवून नवा घडवण्यासाठी 12 कोटी 85 लाख ऊपये स्वनिधी देण्याचीही तयारी देवस्थान समितीने दाखवली. परंतू लोकसभा निवडणूक व नंतर सुरू झालेल्या पावसामुळे दुरवस्थेतील गरूड मंडप उतरून घेण्यात अडचणी आल्या. पावसाचा जोर ओसरल्यानंतर सप्टेंबर महिन्यात ओसवाल कंट्रक्शनचे कंत्राटदार शिवाजी सुतार यांच्या देखरेखीखाली गरूड मंडप पूर्णपणे उतऊन घेतला. यावेळी मंडपाच्या सागवानी लाकडाची सुतार यांनी अभ्यास केला. यामध्ये मंडपाचे लाकुड पाचशे वर्षापूर्वीचे असल्याचे लाकडातील विस्तारलेल्या वार्षिक कड्यांमधून स्पष्ट झाले. शिवाय सर्व लाकुड जीर्ण झाल्याचेहे दिसले.
दरम्यानच्या काळात नागपूरमधील जंगलातून शोधून आणलेल्या सागवानी लाकडाचे नागपूरातच कटिंग करून ते कोल्हापूरातील टेंबलाई टेकडीवर उभारलेल्या मोठ्या शेडमध्ये आणले. 2025 या नव्या वर्षातील जानेवारी महिन्यापासून नवा गरूड मंडप उभारणीचे टारगेट डोळ्यासमोर ठेवण्यात आले होते. त्यानुसार जुन्या गरूड मंडपाच्या विविध भागांचे लाकडीपासून भाग बनवण्याला सुरूवात केली. त्यासाठी 22 कर्मचाऱ्यांचे हात गुंतून गेले. हे सर्वजण जुन्या गरूड मंडपाच्या विविध भागांचे फोटो आणि मापे पाहून नव्या मंडपाचे भाग बनवू लागले. त्यांनी गेल्या तिन महिन्यात नव्या मंडपाचे बाहेरील तिन्ही बाजूंच्या 24 खांबांसह छत, छताच्या दोन्ही बाजूला असलेला कडीपाटाचे (छताच्या दोन्ही बाजूचा तिरका भाग) कटिंग पूर्ण केले आहे. कटिंग केलेल्या सर्वच लाकडी भागांना भविष्यातही किड लागू नये म्हणून अत्याधुनिक बनावटीचे अॅण्टी टरमाईट केमिकल लावण्यात आले आहे. काहीच दिवसांपूर्वी लाकडाचे काही भाग लॅक टेस्टींगसाठी पुण्यातील लॅबोरेटरीकडे पाठवले आहेत. लॅबोरेटरीकडून येणाऱ्या अहवालातून लाकडाचे एकूण आयुष्यमान समजणार आहे. याच आयुष्यमानातून लाकूड उच्च प्रतीचे आहे की नाही याचा उलघडा होणार आहे. दरम्यान, गरुड मंडपाच्या निर्मितीतील दिरंगाईची दखल घेऊन देवस्थान समितीने ठेकेदारांना नियोजित मुदतीच काम पूर्ण करण्याची सुचना दिली आहे. तसेच मंडपाचे कोणते काम कोणत्या वेळी पूर्ण करणार याची माहिती देणारा बारचार्टही ठेकेदारांनी समितीकडे द्यावा, अशी दुसरी सूचना केली आहे. त्यामुळे ठेकेदारांना कामाचे वेग वाढवावा लागणार आहे.

Advertisement

गरूड मंडपाचा डोलारा पेलणाऱ्या अंतरंगातील व बाहेरील मोठ्या 20 खांबाच्या निर्मितीसाठी सागवानी लाकूड मिळत नव्हते. बरीच शोधाशोध केल्यानंतर चंद्रपूरमधील वन विभागाकडून लाकूड मिळाले आहे. या लाकडापासून लवकरच 20 खांब तयार करण्यात येतील. उतरून घेतलेल्या जून्या गरूड मंडपाच्या 51 नक्षीदार कमानी अद्यापही सुस्थितीत आहेत. त्यामुळे सर्व खांबाच्यामध्ये या कमानी लावण्यात येतील. मंडपाचे काम वेगाने करण्याच्या सुचना दिल्या आहे. येत्या महिनाभरात सर्व काम पूर्ण कऊन फेब्रुवारीमध्ये मंदिरात मंडप उभारणीचे काम सुरू केले जाईल.
विलास वहाने (सहायक संचालक : डॉ. विलास वाहने, महाराष्ट्र पुरातत्व विभाग पुणे)

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article