न्यू गांधीनगर रेल्वेगेट आज वाहतुकीसाठी बंद
12:15 PM Apr 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : रेल्वेमार्गाची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने शनिवार दि. 12 रोजी न्यू गांधीनगर येथील रेल्वेगेट बंद ठेवले जाणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 8 या वेळेत रेल्वेमार्ग तसेच गेटजवळ दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन नैर्त्रुत्य रेल्वेच्यावतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement