रामगोपाल वर्मा, मोहित सूरींच्या नव्या चित्रपटाची घोषणा
2025 साली प्रदर्शित अन् मोहित सूरीकडून दिग्दर्शित ‘सैयारा’ने मोठे यश मिळविले होते. आता मोहित सूरी हा रामगोपाल वर्मा यांच्यासोबत मिळून नवा चित्रपट निर्माण करणार आहे. रामगोपाल वर्मा यांनी अत्यंत रंजक शैलीत चित्रपटाची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
रामगोपाल वर्मा यांनी मोहितसोबतचे एक छायाचित्र शेअर केले आहे. तसेच कॅप्शनमध्ये ‘मी आणि सैयारावाला मोहित पुढील चित्रपट एकत्र शिजवत आहोत, एक लव्ह डिश जी गँगस्टर करीने भरपूर असेल. पूर्ण तपशील लवकरच सर्वांसमोर वाढला जाईल’ असे नमूद केले आहे.
मोहितने देखील हा फोटो री-शेअर करत रामगोपाल यांच्याबद्दल स्वत:चे प्रेम व्यक्त केले. त्यांचे चित्रपट पाहणे आणि फिल्ममेकर होण्याचे स्वप्न पाहण्यापासून, त्यांच्यासोबत चित्रपट निर्माण करण्यापर्यंत आणि ते देखील स्वत: ‘ओजी गँगस्टर3= राम गोपालवर्मासोबत चित्रपट निर्माण करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. काही प्रवास खरोखरच पूर्ण होतात असे मोहितने म्हटले आहे. दोन्ही फिल्ममेकर्सनी सध्या एक छोटा अपडेट देत चाहत्यांचा उत्साह वाढविला आहे. तर लवकरच दोघेही पूर्ण माहिती शेअर करतील अशी अपेक्षा आहे. मोहित सूरीची पत्नी उदिता गोस्वामीने या पोस्टवर कॉमेंट करत उत्सुकता व्यक्त केली आहे.