For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘महिला प्रीमियर लीग’मधील नवे चेहरे...

06:30 AM Jan 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘महिला प्रीमियर लीग’मधील नवे चेहरे
Advertisement

क्रिकेट चाहत्यांना आता महिला प्रीमियर लीगच्या बहुप्रतिक्षित चौथ्या हंगामाचे वेध लागलेत...या स्पर्धेत यंदा ज्यांच्यावर विशेष लक्ष राहील अशा अद्याप देशातर्फेही न खेळलेल्या नवोदित चेहऱ्यांवर टाकलेली ही नजर...

Advertisement

  • या यादीत अग्रभागी नाव आहे ते 16 वर्षांच्या दिया यादवचं...दिल्ली कॅपिटल्सनं महालिलावात तिला 10 लाख ऊपयांना करारबद्ध केलं. ती या लीगचा करार मिळणारी आतापर्यंतची सर्वांत तऊण खेळाडू ठरलीय...2023 च्या 15 वर्षांखालील एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत दियानं केलेल्या 213 धावांच्या स्फोटक खेळीपासून तिची तुलना तिची आदर्श असलेल्या शेफाली वर्माशी केली जाऊ लागलीय...
  • विशेष म्हणजे वरिष्ठ महिलांच्या टी-20 चषक स्पर्धेत दिया यादव ही शेफालीच्या मागे हरियाणाची दुसरी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू बनलीय. तिथं तिन 59.60 च्या सरासरीनं 298 धावा केल्याहेत...आंतरविभागीय स्पर्धेत आणि 23 वर्षांखालील टी-20 स्पर्धांमध्ये देखील तिची कामगिरी चमकदार राहिलीय. हरियाणाच्या 23 वर्षांखालील स्पर्धा जिंकणाऱ्या संघाचा ती भाग राहिली...
  • ऑस्ट्रेलियाची मिली इलिंगवर्थ हे आणखी एक असंच तऊण नाव...तिच्यावर लीगमध्ये बारकाईनं लक्ष ठेवलं जाण्याची अपेक्षा आहे. या उजव्या हातानं वेगवान गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूला लिलावात सुरुवातीला दोनदा कुणीही करराबद्ध केलं नव्हतं. मात्र नंतर गतविजेत्या मुंबई इंडियन्सनं 10 लाखांना कराराबद्ध केल्यानं तिला प्रथमच ‘डब्ल्यूपीएल’मध्ये खेळण्याची संधी मिळालीय...
  • इलिंगवर्थची गोलंदाजीची शैली वेगळी तसंच तिच्या खात्यात आहे तो चांगला बाउन्सर. त्यानं महिलांच्या ‘बिग बॅश लीग’मध्ये बड्या फलंदाजांना अडचणीत आणून दाखवलंय...टी-20 क्रिकेटमध्ये तिनं ‘बिग बॅश लीग’च्या 28 डावांत 7.28 च्या इकोनॉमी रेटनं 18 बळी घेतलेत...2023 च्या 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकातही खेळलेल्या इलिंगवर्थनं जर भारतीय परिस्थितीशी लवकर जुळवून घेतलं, तर ही तऊण वेगवान गोलंदाज sंयावेळी मोलाची भूमिका बजावू शकते...
  • अनुष्का शर्मा ही लीगच्या इतिहासातील देशातर्फे न खेळलेली सर्वांत महागडी खेळाडू ठरलीय. मध्यप्रदेशच्या या 22 वर्षीय खेळाडूला रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरसोबतच्या बोली युद्धानंतर गुजरात जायंट्सनं 45 लाख ऊपयांना करारबद्ध केलं. अनुष्का तिच्या अष्टपैलू कौशल्यासाठी ओळखली जाते आणि तिनं देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केलीय...
  • तिची ‘अ’ श्रेणी क्रिकेटमधील सरासरी 63 इतकी आणि तिनं वरिष्ठ महिला आंतरविभागीय टी-20 चषक स्पर्धेत 125 च्या स्ट्राइक रेटनं धावा केल्याहेत. फटकेबाजीची तिची क्षमता या स्पर्धेत तसंच मध्यप्रदेश महिला लीगमध्ये ‘बुंदेलखंड बूल्स’तर्फे खेळतानाही दिसून आलीय...फलंदाजी नि गोलंदाजी अशा दोन्ही विभागांमध्ये योगदान देण्याची अन् दबावाच्या परिस्थितीत खेळण्याची ताकद यामुळं ती उच्च दर्जाची खेळाडू मानली जाते...
  • व्ही. व्ही. एस लक्ष्मण आणि मिताली राज यासारख्या खेळाडूंना घडविणाऱ्या हैदराबादच्या प्रसिद्ध सेंट जोन्स कोचिंग फाऊंडेशनची विद्यार्थिनी असलेल्या जी. त्रिशानं वरच्या फळीतील फलंदाज म्हणून प्रभावी कामगिरी केलीय. तिनं अवघ्या आठ वर्षांची असताना हैदराबादच्या 16 वर्षांखालील संघात पदार्पण केलं आणि त्यानंतर 19 वर्षांखालील आणि 23 वर्षांखालील स्तरांवर सहज प्रगती केली...
  • 19 वर्षीय त्रिशा 2024 मधील भारताच्या विजयी युवा विश्वचषक मोहिमेत स्पर्धावीर ठरली होती. त्यात तिनं स्कॉटलंडविऊद्ध त्या स्पर्धेत शतक झळकावणारी पहिली महिला खेळाडू बनण्याचा मान मिळवला. जी. त्रिशानं सदर स्पर्धेत 77.25 च्या सरासरीनं 309 धावा केल्या आणि आपल्या लेगस्पिन गोलंदाजीनं सात बळीही घेतले. यूपी वॉरियर्ससाठी अष्टपैलू खेळाडू म्हणून तिचं असलेलं महत्त्व यातून स्पष्ट होतं...

राजू प्रभू

Advertisement
Advertisement
Tags :

.