कलंबिस्त ग्रामसेवा मुंबई मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर
सावंतवाडी : प्रतिनिधी
कलंबिस्त ग्रामसेवा मुंबई मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून मंडळाच्या अध्यक्षपदी विश्वनाथ सावंत यांची फेरनिवड करण्यात आली तर सचिवपदी माजी सैनिक रविंद्र सावंत, खजिनदार प्रकाश तावडे यांची एकमताने निवड करण्यात आली. कलंबिस्त ग्रामसेवा मुंबई मंडळ हे मुंबई स्थित ग्रामस्थांच्या हितासाठी आणि अडचणी सोडवण्यासाठी स्थापन झाले आहे . हे मंडळ मुंबईत गावाच्या विकासाच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करत आहे. मंडळाची बैठक मुंबई येथे घेण्यात आली . यावेळी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली या बैठकीला माजी सचिव शशिकांत सावंत, सुरेश सावंत ,चंद्रकांत बिडये ,प्रकाश मायबा सावंत ,जयसिंग देसाई, काशीराम म्हाडगुत,रमेश देसाई ,दीपक पास्ते लक्ष्मण मर्गज ,शांताराम बिडये ,अमित मेस्त्री ,रवींद्र सावंत, बापू पांगम, ज्ञानेश तावडे ,राजेश सावंत, दशरथ बिडये, अनंत सावंत ,महादेव सावंत, सुरेश पास्ते, प्रकाश तावडे ,मिलिंद मटकर, अमित बिडये आधी उपस्थित होते.
यावेळी सचिव शशिकांत सावंत यांनी पदाचा राजीनामा दिला त्याबद्दल चर्चा करण्यात आली व तो राजीनामा मंजूर करून नवीन कार्यकारिणी निवडण्याबाबत चर्चा झाली यावेळी नवीन कार्यकारिणी निवडताना तरुणांना जास्तीत जास्त मंडळाच्या सभासद करणे व मंडळ अधिक गतीने वाढवणे या दृष्टीने विचार करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ सावंत यांनी स्पष्ट केले, कलंबिस्त गाव विकासाच्या दृष्टीने आपण यापूर्वी काम केले आहे. यापुढेही काम करायचे आहे. मुंबईत गावातील अनेक जण नोकरीच्या निमित्ताने कार्यरत आहेत. त्यांच्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने हे मंडळ नेहमी सहकार्य करत आहे तसेच गावचा एकीचा नारा या निमित्ताने आपण देऊया असे ते म्हणाले. यावेळी सुरेश सावंत यांनी गेल्या कित्येक वर्षापासून हे मंडळ कार्यरत आहे. या मंडळाच्या हिताच्या दृष्टीने आपण पुन्हा एकदा एकत्र येऊया असे आवाहन केले. मुंबईमध्ये आपल्या गावातील हजारहून अधिक नागरिक नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत त्यांची एकी व एकीचा नारा आपण यानिमित्ताने देऊया. मुंबई व गावाच्या विकासाच्या दृष्टीने आपण हातभार लावूया. गेली काही वर्ष मंडळाचे उपक्रम झाले नसून आता आपण जोमाने पुन्हा कामाला लागूया . तरुणांनी जास्तीत जास्त सभासद व्हावे असे आवाहनही चंद्रकांत बिड्ये त्यांनी केले. यावेळी शशिकांत सावंत नवनिर्वाचित सचिव रवींद्र सावंत, खजिनदार प्रकाश तावडे आदींनी आपले विचार मांडले.