महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फेडरलच्या निर्णयाने बाजारात नवा उत्साह

06:48 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सेन्सेक्स 612 अंकांनी वधारला : पेटीएमचे समभाग घसरणीत

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेकडून शुक्रवारी व्याजदर कपातीचे संकेत व्यक्त करण्यात आल्यानंतर त्याचे सकारात्मक पडसाद सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअरबाजारावर पाहायला मिळाले. माध्यम आणि सार्वजनिक बँकांचा निर्देशांक वगळता इतर सर्व निर्देशांक तेजीसमवेत बंद झाले.

सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 612 अंकांनी वाढत किंवा 0.75 टक्के वाढत 81,698 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 187 अंकांनी वाढत किंवा 0.76 टक्के वाढत 25010 अंकांवर बंद होण्यामध्ये यशस्वी झाला. सेन्सेक्समधील 30 कंपन्यांपैकी 21 कंपन्यांमध्ये तेजी पाहायला मिळाली आणि 9 कंपन्यांचे समभाग मात्र घसरणतीच राहिले होते. यामध्ये एचसीएल टेक्नॉलॉजीज, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, टेक महिंद्रा, टायटन आणि महिंद्रा आणि महिंद्रा यांचे समभाग मोठ्या प्रमाणात तेजीसह बंद झाले. दुसरीकडे घसरणीमध्ये कोटक बँक, इंडसइंड बँक, मारुती सुझुकी, सनफार्मा यांचा समावेश होता.

बाजारामध्ये तेजी कायम ठेवण्यामध्ये टाटा मोटर्स, टीसीएस, लार्सन टुब्रो, पॉवरग्रिड कॉर्प, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि भारती एअरटेल यांचासुद्धा चांगला वाटा दिसून आला. आयटीसी, नेस्ले आणि अदानी पोर्ट्स यांचे समभाग घसरणीत होते.

निफ्टीमधील 50 कंपन्यांपैकी 22 कंपन्यांचे समभाग तेजीत दिसून आले. पेटीएमचे समभाग सर्वाधिक 5 टक्के इतके घसरलेले पाहायला मिळाले. बाजारातील नियामक सेबीने पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. या बातमीचा परिणाम समभागावर सोमवारी दिसून आला.

जागतिक बाजारात....

आशियाई बाजारात जपानचा निक्केई 0.66 टक्के घसरणीत होता तर  हाँगकाँगचा हँगसेंग 1 टक्का व चीनचा शांघाय कंपोझिट 0.040  टक्के वाढला होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article