For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय अंतराळ स्थानकाचे नवे डिझाइन समोर

06:45 AM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय अंतराळ स्थानकाचे नवे डिझाइन समोर
Advertisement

52 टनाच्या 6 मॉड्यूलमध्ये 6 जण सामावणार

Advertisement

भारतीय अंतराळ स्थानकाचे लेटेस्ट डिझाइन आता सर्वांसमोर आले आहे. भारताचे हे अंतराळ स्थानक एकूण 52 टन वजनाचे असणार आहे. हे 27 मीटर लांब म्हणजेच 88.58 फूट आणि 20 मीटर रुंद म्हणजेच 65.61 फूटांचे असेल.

भारताच्या अंतराळ स्थानकात सर्वसाधारणपणे 3-4 अंतराळवीर राहतील, परंतु प्रसंगी यात कमाल 6 अंतराळवीर सामावले जाऊ शकतील. पूर्वी याचे वजन 25 टन निर्धारित करण्यात आले होते, यात केवळ 3 अंतराळवीर सामावण्याची क्षमता होती, ती देखील केवळ 15-20 दिवसांसाठीच. परंतु नव्या डिझाइनमध्ये  अंतराळ स्थानकाला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापेक्षाही चांगले निर्माण करण्याचा मनोदय आहे. इस्रोच्या नियोजनानुसार भारतीय अंतराळ स्थानक 2035 पासून ऑपरेशनल होणार आहे.

Advertisement

या अंतराळ स्थानकात नवया प्रकारचा युनिवर्सल डॉकिंग आणि बर्थिंग सिस्टीम लावली जाणार आहे. जेणेकरून गरज भासल्यास दुसऱ्या देशांच्या अंतराळयानांसोबत जोडता येईल. रोल आउट सोलर ऐरे असेल, जो गरजेच्या वेळी फोल्ड करता येईल. जेणेकरून अंतराळाच्या कचऱ्यापासून त्याची धडक टाळता येईल.

400 ते 450 किमीच्या उंचीवर प्रदक्षिणा

अंतराळ स्थानकावर प्रोपेलेंट रीफ्यूलिंग आणि सर्व्हिसिंगची व्यवस्था असेल. नव्या प्रकारचे एवियोनिक्स आणि कम्युनिकेशन सिस्टीम लावण्यात येईल. तसेच इनर्शियल कंट्रोल सिस्टीम असणार आहे. हे अंतराळ स्थानक पृथ्वीपासून 400 ते 450 किलोमीटरच्या कक्षेत प्रदक्षिणा घालणार आहे. अंतराळातील कचरा, उल्कापिंडांची धडक टाळण्यासाठी ही उंची निर्धारित करण्यात आली आहे.

अमेरिकेची मदत

मागील वर्षीच अमेरिकेची अंतराळ संस्था नासाचे प्रमुख बिल नेल्सन हे भारताच्या दौऱ्यावर आले होते. त्यादरम्यान त्यांनी भारतीय अंतराळ स्थानक निर्माण करण्यास अमेरिका आणि नासा मदत करण्यास तयार असल्याचे जाहीर केले होते. अमेरिका आणि भारत मिळून एक-दोन वर्षांमध्ये भारतीय अंतराळवीराला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठविण्याची योजना आखत असल्याची माहितीही त्यांनी दिली होती.

भारत ठरविणार स्वत:चा अंतराळवीर

कोणाता भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणार याचा निर्णय इस्रो घेणार आहे, त्यात अमेरिका हस्तक्षेप करणार नाही. या कार्यक्रमाला चालना देत भारतीय अंतराळवीर अमेरिकन रॉकेटद्वारे अंतराळात पाठविण्यास आम्ही तयार आहोत असे नेल्सन यांनी स्पष्ट केले होते.

भारताकडे 2040 पर्यंत स्वत:चे अंतराळस्थानक असेल तर हे काम त्यापूर्वी पूर्ण होण्याचीही शक्यता आहे. हे एक वाणिज्यिक अंतराळस्थानक असेल. भारताची इच्छा असेल तर अमेरिका आणि नासा याकरता मदत करण्यास तयार आहेत. परंतु हा निर्णय भारताला घ्यावा लागणार असल्याचे नेल्सन यांनी म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोला 2035 पर्यंत भारतीय अंतराळस्थानक निर्माण करण्याचे आणि 2040 पर्यंत चंद्रावर भारतीय अंतराळवीर पोहोचविण्याचे लक्ष्य दिले आहे. इस्रो सध्या अमेरिकेच्या प्रमुख अंतराळ कंपन्या बोइंग, ब्लू ओरिजिन आणि वॉयजर यांच्यासोबत चर्चा करत आहे.

Advertisement
Tags :

.