महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘एनटीए’ परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर

06:34 AM Jun 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

10 जुलै ते 4 सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन परीक्षा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) शुक्रवारी रात्री युजीसी-नेट, सीएसआयआर-नेट आणि एनसीईटी परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षा 10 जुलै ते 4 सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. या तीन परीक्षा यापूर्वी जूनमध्ये होणार होत्या. मात्र, त्या विविध कारणांमुळे रद्द करण्यात आल्या होत्या. नवीन तारखांनुसार एनसीईटी परीक्षा 10 जुलै 2024 रोजी होणार आहे. तर युजीसी-नेट 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान होईल. त्याचबरोबर सीएसआयआर-युजीसी-नेट 25 जुलै ते 27 जुलै दरम्यान घेण्याचे जाहीर करण्यात आले आहे. यावेळी परीक्षा पद्धतीही ऑनलाईन ठेवण्यात आली आहे. यापूर्वी युजीसी-नेट परीक्षा पेन आणि पेपर मोडमध्ये आयोजित केली होती. याशिवाय, अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षा (एआयएपीजीईटी) 2024 नियोजित तारखेला म्हणजेच 6 जुलै रोजी होणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article