रवींद्रभवन वास्कोच्या नवीन समितीचे अधिकारग्रहण
वास्को : बायणा वास्को येथील रवींद्रभवनच्या नवीन कार्यकारी समितीने नुकतेच अधिकारग्रहण केले. याप्रसंगी वाहतुक व पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, वास्कोचे आमदार दाजी साळकर, मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकर व रवींद्रभवन वास्कोचे अध्यक्ष जयंत जाधव उपस्थित होते. मंत्री माविन गुदिन्हो तसेच आमदार संकल्प आमोणकर व आमदार दाजी साळकर यांनी नूतन समितीचे अभिनंदन व मार्गदर्शन केले. नवीन समितीचे पदाधिकारी व सदस्यांनी आपली ओळख करून दिली. प्रारंभी रवींद्रभवनचे अध्यक्ष जयंत जाधव यांनी उपस्थितांचे सवागत केले. प्रवेश आमोणकर यांनी सुत्रसंचालन केले. रवींद्रभवन वास्कोच्या कार्यकारी समितीचे पदाधिकारी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष - जयंत जाधव, उपाध्यक्ष - डॉ. धर्मेंद्र प्रभुदेसाई, कार्यकारी सदस्य - शांताराम पराडकर, रवळनाथ पेडणेकर, सदानंद घोणसेकर, अंकुश च्यारी, अरविंद शिंदे, धोंडु कोचरेकर, प्रकाश गावस, अर्चना कोचरेकर, दिलीप काजळे व गौरीश नाईक.