For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय टेटे संघासाठी नवा प्रशिक्षक लवकरच

06:27 AM Mar 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय टेटे संघासाठी नवा प्रशिक्षक लवकरच
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

गेल्या सहा वर्षांच्या कालावधित भारतीय टेबल टेनिसपटूंना प्रमुख प्रशिक्षकापासून वंचित व्हावे लागले आहे. दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये भारताच्या इलाईट टेबल टेनिसपटूंना प्रमुख प्रशिक्षक लाभेल, असे अखिल भारतीय टेबल टेनिस फेडरेशनच्या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान भारताच्या राष्ट्रीय टेटे संघाकरिता इटलीच्या मॅसिमो कॉस्टेन्टीनी यांची तिसऱ्यांदा प्रमुख प्रशिक्षक पदासाठी नियुक्त केले जाण्याचे संकेत मिळाले आहेत.

इटलीचे मॅसिमो कॉस्टेनटीनी यांनी 2009 ते 2010 तसेच 2016 ते 2018 या कालावधित दोन वेळेला भारतीय टेटे फेडरेशन समवेत प्रमुख प्रशिक्षक म्हणून करारबद्ध झाले होते. 65 वर्षीय कॉस्टेन्टीनी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय टेटे संघाने 2018 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच पदक मिळविण्याचा विक्रम केला होता. 2018 नंतर भारतीय टेटे संघाला प्रमुख प्रशिक्षक मिळू शकला नाही. इटलीच्या कॉस्टेन्टीनी यांनी दीर्घ कालाच्या मुदतीची अट फेडरेशनला घातली होती. दरम्यान भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाने कॉस्टेन्टीनी यांच्याबरोबर चार वर्षांचा करार करण्यास नकार दिला आहे. जागतिक टेबल टेनिस क्षेत्रामध्ये कॉस्टेन्टीनी यांना मॅक्स या टोपण नावाने ओळखले जाते. पुढील आठवड्यात कॉस्टेन्टीनी यांची भारतीय टेटे संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती केली जाईल आणि साईकडून त्याला अधिकृत मान्यता मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या भारतीय टेबल टेनिसपटूंना अरुप बसक, सौरभ चक्रवर्ती आणि ममता प्रभू या भारतीय प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Advertisement

आता या आगामी महत्त्वाच्या स्पर्धेसाठी भारतीय टेटे संघांना आशिया आणि युरोपमध्ये प्रशिक्षण सरावासाठी पाठविले जाणार आहे. त्याचप्रमाणे चीन आणि कोरियामध्ये भारतीय टेबल टेनिसपटूंसाठी खास सरावाचे शिबिर आयोजित केले जाणार असल्याचे फेडरेशनच्या प्रवक्त्याने सांगितले

Advertisement
Tags :

.