महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक लवकरच: जय शहा

06:42 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ब्रिजटाऊन

Advertisement

भारतीय क्रिकेट संघाला नवा प्रशिक्षक लवकरच उपलब्ध करुन देण्यात येईल. तथापि, चालु महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या श्रीलंका विरुध्दच्या मर्यादीत षटकांच्या मालिकेवेळी भारतीय संघाला नवा प्रमुख प्रशिक्षक मिळणार असल्याचे वृत्त बीसीसीआयचे सचव जय शहा यांनी सोमवारी येथे वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

Advertisement

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. या संघाला प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविडचे बहुमोल मार्गदर्शन लाभले होते. बीसीसीआय बरोबरचा द्रविडचा करार संपुष्टात आला आहे. द्रविडची विंडीजमध्ये झालेली आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा शेवटची होती. भारताचा माजी सलामीचा फलंदाज गौतम गंभीरची भारतीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती केली जाईल, अशी चर्चा क्रिकेट क्षेत्रात चालु आहे. अलिकडेच बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने गौतम गंभीर आणि भारतीय महिला क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक वूरकेरी रमन यांची मुलाखत घेतली आहे. लवकरच नव्या प्रशिक्षकाची घोषणा केली जाईल, असे सचिव जय शहा यांनी सांगितले.

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांचे वास्तव्य सध्या विंडीजमध्ये विजेत्या भारतीय क्रिकेट संघाबरोबर आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीर आणि वूरकेरी रमन हे दोन इच्छुक उमेदवार या दोन्ही उमेदवारांची मुलाखती यापूर्वीच घेण्यात आल्या आहेत. व्ही.व्ही.एस. लक्ष्मण झिंम्बाब्वेला जाणार असल्याने चालु महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या लंके विरुध्दच्या मालिकेसाठी नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा झिंम्बाब्वे दौरा 6 जुलैपासून सुरू होणार आहे. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघ लंकेच्या दौऱ्यावर 27 जुलैपासू जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघात तीन टी-20 सामन्यात आणि तीन वनडे सामने खेळविले जाणार आहेत.

वरिष्ठ खेळाडूंचे योगदान महत्वाचे

गेल्या शनिवारी झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने द. आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करुन तब्बल 11 वर्षांनंतर या स्पर्धेचे अजिंक्यपद दुसऱ्यांदा पटकाविले. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने 2007 साली पहिल्यांदा आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली होती. भारतीय संघाला ही स्पर्धा पुन्हा जिंकण्यासाठी तब्बल 11 वर्षांचा कालावधीची वाट पहावी लागली. भारतीय संघातील ज्येष्ठ आणि अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या बहुमोल योगदानामुळेच भारतीय संघाला जेतेपद मिळू शकले, असे मत सचिव जय शहा यांनी व्यक्त केले. या स्पर्धेनंतर भारतीय संघातील तीन ज्येष्ठ खेळाडूं, कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि अष्टपैलु रविंद्र जडेजा यांनी टी-20 प्रकारातून निवृत्तीचा निर्णय घेतला. या निर्णयाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना जय शहा म्हणाले की, कोणत्याही चांगल्या क्रिकेटपटूला क्रिकेटचा निरोप कोणत्या क्षणी घ्यावयाचा याची चांगली जाणिव असते. दरम्यान या तीन क्रिकेटपटूंच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे आता भारतीय क्रिकेट संघामध्ये अनुभवी खेळाडूंची उणिव काही दिवस निश्चितच भासेल. गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत या तीन ज्येष्ठ खेळाडूंनी भारतीय संघाचा दर्जा उंचाविण्यामध्ये मोलाचे योगदान दिल्याचे शहा यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत आयसीसीच्या दोन मोठ्या स्पर्धा झाल्या. भारतामध्ये झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. पण ऑस्ट्रेलियाकडून भारताला अंतिम सामन्यात हार पत्कारावी लागल्याने त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. नजीकच्या काळामध्ये आयसीसीच्या क्रिकेटमधील या तिन्ही प्रकारातील स्पर्धा  जिंकण्याची क्षमता भारतीय संघामध्ये पहावयास मिळेल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. भारतीय संघामध्ये स्थान मिळविण्यासाठी नवोदित युवा खेळाडूंमध्ये सध्या चुरस पहावयास मिळत आहे. आता विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धा तसेच चॅम्पियन ट्रॉफी जिंकणे हे भारतीय संघाचे पुढील उद्दिष्ट राहिल, असेही बीसीसीआयच्या सचिवांनी सांगितले. भारतीय अ संघ चालु वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. तसेच या दरम्यान भारतीय संघाचा ऑस्टेलिया दौरा निश्चित झाला आहे. या दौऱ्यात भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. सध्या विंडीजमध्ये वादळी वारा आणि पावसाचे वातावरण असल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचे प्रयाण थोडे लांबले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article