For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंतराळकेंद्रात शोधला कॅन्सरवरील नवा उपचार

06:22 AM Jan 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
अंतराळकेंद्रात शोधला कॅन्सरवरील नवा उपचार
Advertisement

दोन तासांची ट्रीटमेंट आता दोन मिनिटात पूर्ण

Advertisement

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर करण्यात आलेल्या एका वैज्ञानिक संशोदानाने मोठे यश मिळविले आहे. नासा आणि औषध कंपनी मर्कच्या टीमने मिळून अंतराळात प्रोटीन क्रिस्टल ग्रोथचे अध्ययन केले, यामुळे कॅन्सरवरील एक प्रमुख औषधाचे नवे रुप विकसित झाले आहे. अमेरिकन फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए) सप्टें         बर 2025 मध्ये या नव्या इंजेक्शनला मंजुरी दिली आहे. आता रुग्णांना 2 तास दीर्घ इन्फ्यूजनच्या जागी केवळ 1-2 मिनिटांचे इंजेक्शन दिले जाणार आहे. ही घडामोड कॅन्सरच्या रुग्णांसाठी दिलासाजनक आहे, कारण उपचार सोपा, वेगवान आणि स्वस्त झाला ाअहे.

काय आहे नवा उपचार

Advertisement

हा नवा उपचार कंपनी मर्कचे औषध पेम्ब्रोलुजमाबचे सबक्यूटेनियस इंजेक्शन रुप आहे. हे औषध इम्युनोथेरपीच्या श्रेणीत मोडते. काही खास प्रकारच्या कॅन्सरच्या (मेलोनामो, लंग कॅन्सर इत्यादी) उपचारात याचा वापर होतो.

पूर्वी कसे दिले जायचे औषध

-रुग्णाला रुग्णालय किंवा क्लीनिकला जावे लागत होते.

-नसामध्ये इन्फ्यूजन (आयव्ही ड्रिप)द्वारे औध दिले जायचे.

-याकरता 1-2 तासांचा कालावधी लागत होता.

-नंतर हा कालावधी 30 मिनिटांपर्यत कमी झाला होता.

आता नवी पद्धत

-त्वचेखाली (सबक्यूटेनियस) केवळ एक इंजेक्शन

-इंजेक्शन देण्यास 1-2 मिनिटांचा कालावधी

-दर तीन आठवड्यांनी एकदा

-रुग्णाचा वेळ वाचतो, रुग्णालयाचा खर्च कमी होतो

अंतराळस्थानकाच्या संशोधनाची मदत

अंतराळात गुरुत्वाकर्षण अत्यंत कमी असते. याला मायक्रोग्रॅव्हिटी म्हटले जाते, पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणामुळे क्रिस्टल तयार करताना अनेक समस्या येतात. उदाहरणार्थ क्रिस्टल छोटे, असमान किंवा कमी गुणवत्तायुक्त निर्माण होतात. परंतु अंतराळात क्रिस्टल मोठे, एकसमान आणि अधिक परिपूर्ण तयार होतात. यामुळे वैज्ञानिक औषधाच्या अणूंची संरचना चांगल्याप्रकारे समजून घेऊ शकतात.

मर्क कंपनी 2014 पासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर प्रयोग करत आहे. कंपनीने मोनोक्लोनल अँटीबॉडी (प्रयोगशाळेत निर्मित प्रोटीन जे शरीराची रोगप्रतिकारकक्षमता वाढविते)चे क्रिस्टल अंतराळात उगविले आहेत. या क्रिस्टलद्वारे औषधांच्या कणांचा सर्वात चांगला आकार आणि संरचना कशी असावी हे कळले आहे. यामुळे ते सहजपणे विरघळवत इंजेक्शनच्या स्वरुपात देता येणार आहे. हे संशोधन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या नॅशनल लेबोरेट्रीच्या सहाय्याने झाले आहे. नासा अंतराळ स्थानकाला खासगी कंपन्या आणि वैज्ञानिकांसाठी खुले ठेवते, जेणेकरून गुरुत्वाकर्षणाचा लाभ घेत नवे संशोधन करता येईल.

अंतराळ संशोधनाचे लाभ

-पृथ्वीवर औषधांचा विकास जलद आणि चांगला होतो.

-कॅन्सरसारख्या जटिल रोगांवर उपचार सोपा करतो.

-अंतराळवीरांसाठी दीर्घ अंतराळ मोहिमेची (चंद्र अन् मंगळ) तयारीही होते.

-कमर्शियल स्पेस इकोनॉमी वाढते, खासगी कंपन्यांची अंतराळक्षेत्रात गुंतवणूक

अंतराळ स्थानकावर करण्यात आलेले काम केवळ अंतराळवीरांची प्रकृती सुधारत नसून पृथ्वीवर लाखो लोकांचे जीवन सुधारते. अंतराळातील संशोधन कशाप्रकारे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतेय हे या उदाहरणातून स्पष्ट होते. भविष्यात अंतराळ संशोधनाद्वारे आणखी अनेक नवी औषधे आणि उपचारपद्धती समोर येऊ शकतात. कॅन्सर रुग्णांसाठी हे नवे इंजेक्शन एक मोठा आशेचा किरण असल्याचे नासाने म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.