For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारसाठी नवीन ‘सीएएफइ-3’ नियम जारी

07:00 AM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
कारसाठी नवीन  ‘सीएएफइ 3’ नियम जारी
Advertisement

लहान पेट्रोल कारला सूट नाही : हे मानक 2027 पासून लागू होणार

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली 

सरकारने कार्बन उत्सर्जनासंदर्भात नवीन नियम अधिसूचित केले आहेत. नवीन नियमांनुसार अवजड वाहनांसाठी इंधन बचतीचे अधिक कठोर नियम असतील. इलेक्ट्रिक, हायब्रीड आणि पर्यायी इंधन वाहने बनवल्याने कंपन्यांना उत्सर्जनाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त फायदा मिळणार असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

सीएएफइ-3 नियम

प्रवासी वाहनांचा इंधन वापर आणि कार्बन उत्सर्जन नियंत्रित करण्यासाठी सरकारने नवीन सीएएफइ-3 नियम अधिसूचित केले आहेत. हे नियम 1 एप्रिल 2027 ते 31 मार्च 2032 पर्यंत लागू असतील. अंतिम नियमांमध्ये हलक्या पेट्रोल कारला विशेष सूट देण्यात आलेली नाही, जी सुरुवातीच्या मसुद्यात प्रस्तावित होती. ऊर्जा मंत्रालयाच्या मते, हे नवीन मानक भारतात विक्रीसाठी उत्पादित आणि आयात केलेल्या नवीन प्रवासी कारला लागू होतील. यामध्ये हॅचबॅक, सेडान, युटिलिटी व्हेइकल्स आणि मल्टी-पर्पज व्हेइकल्स यांचा समावेश आहे, ज्यात चालकाव्यतिरिक्त आठ प्रवाशांपर्यंत बसण्याची क्षमता असते. सीएएफइ: म्हणजेच कॉर्पोरेट कव्हरेज फ्युएल इकॉनॉमी अंतर्गत, वाहन कंपनीच्या वाहनांच्या सरासरी इंधन वापरासाठी आणि उत्सर्जनासाठी लक्ष्य निश्चित केले जाते. कंपन्यांना नवीन नियमांनुसार त्यांच्या उत्पादनाचे नियोजन करावे लागणार आहे.

लहान पेट्रोल गाड्यांसाठी काय बदल?

सुरुवातीच्या मसुद्यात, पेट्रोल गाड्या परवडणाऱ्या राहाव्यात यासाठी 909 किलोपेक्षा कमी वजनाच्या गाड्यांना विशेष सूट देण्याचा प्रस्ताव होता. हा लाभ अंतिम नियमांमधून काढून टाकण्यात आला आहे. तथापि, वजनावर आधारित लक्ष्य निश्चित करण्याची पद्धतही बदलण्यात आली आहे. हलक्या वाहनांसाठी तुलनेने सोपी लक्ष्ये असतील, तर जड वाहनांना इंधन बचतीच्या अधिक कठोर आवश्यकता पूर्ण कराव्या लागतील.

इंधन वापराचे लक्ष्य किती कठोर असेल?

नवीन आराखड्यात, पंचवार्षिक लक्ष्ये टप्प्याटप्प्याने अधिक कठोर केली जातील. इंधन वापराचा निकष आर्थिक वर्ष 2027-28 मधील 3.996 लिटर प्रति 100 किमी वरून आर्थिक वर्ष 2031-32 मध्ये 3.3273 लिटर प्रति 100 किमी पर्यंत खाली येईल. अशाप्रकारे, पाच वर्षांत इंधन वापराच्या मानकांमध्ये सुमारे 16.7 टक्क्यांनी सुधारणा करण्याचे लक्ष्य आहे. ही उद्दिष्ट्यो गाठण्यासाठी कंपन्यांना स्वच्छ तंत्रज्ञान, पर्यायी इंधन आणि इतर नवीन उपाययोजना स्वीकारण्यास सक्षम केले आहे.

Advertisement
Tags :

.