रस्त्यामध्येच बंद पडली नवीन बस
काँग्रेस रोडवर वाहतुकीची कोंडी
बेळगाव : वायव्य परिवहन मंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेली बस बुधवारी रात्री मुख्य रस्त्यावरच बंद पडली. काँग्रेस रोडवर तांत्रिक बिघाड झाल्याने बस थांबविण्यात आल्याने वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे अवजड वाहने बसच्या बाजूने पुढे सरकली जात असल्याने वाहतूक कोंडी वाढली. परिवहन मंडळाची बेळगाव-मजगाव बस बुधवारी रात्री 7 च्या सुमारास ब्रेकफेल झाल्याने रस्त्यावर थांबली. काँग्रेस रोडवर मुख्य रस्त्यामध्येच बस थांबल्याने पाठीमागे वाहने अडकली गेली. काँग्रेस रोडवरून अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे काहीवेळातच वाहनांच्या रांगा लागल्या. मराठा कॉलनी कार्नर, परिसरात बस अडकल्याने मिलिटरी महादेव मंदिरापर्यंत वाहने अडकली होती. नवीन बस काही महिन्यांपूर्वीच परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. परंतु त्यामध्ये अचानक बिघाड होत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.