महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

नव्या शैक्षणिक वर्षाला 31 मे पासून प्रारंभ

11:18 AM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पहिल्या दिवशी होणार प्रारंभोत्सव

Advertisement

बेळगाव : नवीन शैक्षणिक वर्षाला दि. 29 मे पासून प्रारंभ होणार असला तरी नवीन विद्यार्थ्यांचा प्रारंभोत्सव शुक्रवार दि. 31 मे रोजी होणार आहे. त्यामुळे शुक्रवारपासून विद्यार्थी शाळांमध्ये दाखल होणार आहेत. त्यापूर्वी सर्व शिक्षकांनी शाळेवर दाखल होऊन प्रारंभोत्सवाची तयारी करण्याच्या सूचना जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना केल्या आहेत. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन तेथील सुविधांची पाहणी करावयाची आहे. दि. 29 व 30 रोजी शिक्षकांनी शाळेतील स्वच्छता करण्यासोबतच एसडीएमसी कमिटीची बैठक घ्यावयाची आहे. वर्षभराचा आराखडा तयार करून वेळापत्रक तयार करावे. प्रभागातील शाळाबाह्या विद्यार्थ्यांची माहिती घेऊन त्यांच्या घरी जाऊन भेटी द्याव्यात. प्रारंभोत्सवानिमित्त शाळेला आकर्षक पद्धतीने सजावट करण्याची सूचना करण्यात आली आहे. दि. 31 रोजी नवीन वर्षाचा प्रारंभोत्सव होणार आहे. यावेळी मोफत पाठ्यापुस्तके, तसेच गणवेशांचे वितरण केले जाणार आहे. विद्यार्थी व पालकांना मध्यान्ह आहार दिला जाणार आहे. जून महिन्यात पावसाचे वातावरण असल्याने शाळा परिसरात पाणी आल्यास शाळांना सुटी द्यावी. जे विद्यार्थी नदी-नाले ओलांडून येतात, त्यांची माहिती जमा करावी.

Advertisement

30 जूनपर्यंत सेतूबंध

नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली तरी मागील वर्षाच्या अभ्यासक्रमाची उजळणी घेऊन त्यानंतरच पुढील वर्षाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली जाणार आहे. यासाठी 1 ते 30 जून दरम्यान सेतूबंध कार्यक्रम घेतला जाणार आहे. शाळा परिसरात 5 जून रोजी पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्याच्या सूचना गटशिक्षणाधिकारी व शिक्षकांना केल्या आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article