नेव्हिल टाटा स्टोअरच्या मार्केटचे प्रमुख
07:00 AM Aug 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
नवी दिल्ली : टाटा समूहात नव्या पिढीचे युग सुरू झाले आहे. 32 वर्षीय नेव्हिल टाटा यांनी स्टार बाजारचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. स्टार बाजार हा टाटा समूहाच्या रिटेल व्यवसायाचा एक भाग आहे. नेव्हिल हे टाटा सन्सचे अध्यक्ष एमिरेट्स रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांचा मुलगा आहे. नोएल हे ट्रेंट लिमिटेडचे अध्यक्ष आहेत. नेव्हिल पूर्वी ट्रेंट हायपरमार्केटच्या बोर्डावर एक बिगर-कार्यकारी संचालक होते. ट्रेंट लिमिटेडकडे वेस्टसाइड, झुडिओ आणि झारा यांसारख्या ब्रँडची मालकी आहे, शिवाय हायपरमार्केट युनिट स्टार बाजारचीही. नेव्हिल 2016 पासून ट्रेंट लिमिटेडशी संबंधित आहे.
Advertisement
Advertisement