For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेत्रावती एक्सप्रेसला राजापूर येथे थांबा मंजूर; प्रवासी संघटनेच्या मागणीला यश

03:47 PM Aug 12, 2025 IST | अनुजा कुडतरकर
नेत्रावती एक्सप्रेसला राजापूर येथे थांबा मंजूर  प्रवासी संघटनेच्या मागणीला यश
Advertisement

न्हावेली / वार्ताहर

Advertisement

राजापूर रोड हे कोकण रेल्वे मार्गावरील एक महत्वाचे स्टेशन असून त्याला तालुक्यातील जवळपास ११० गावे जोडलेली आहे,मात्र आत्तापर्यत येथे दिवा सावंतवाडी एक्सप्रेस,कोकणकन्या एक्सप्रेस व मांडवी एक्सप्रेसला थांबे देण्यात आले होते,मात्र राजापूर रोड स्टेशनमधून कोकण रेल्वेला मिळणारे वार्षिक उत्पन्न पाहता येथे नेत्रावती एक्सप्रेस,जनशताब्दी एक्सप्रेस व ओखा एक्सप्रेसला थांबा मिळावा यासाठी प्रवासी संघटनेचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता,याला अखेर यश मिळताना दिसत आहे असे प्रवासी संघटनेचे सेक्रेटरी यशवंत जडयार यांनी सांगितले.लोकमान्य टिळक टर्मिनस ते त्रिवेंद्रम दरम्यान धावणारी १६३४५ /४६ दैनिक नेत्रावती सुपरफास्ट एक्सप्रेस ही डाऊनमार्गावर सकाळी ११.४० मि. कुर्ला येथून सुटेल ती सायं.७.४० मि.राजापूर रोड येथे पोहोचेल तर रोज कोकणातून अपमार्गावर मुंबईच्या दिशेने धावणारी नेत्रावती सकाळी ७.४० मि.राजापूर रोड येथून सुटेल.ही रेल्वे सेवा प्रायोगिक तत्वावर असून दि.१५ ऑगस्ट २०२५ पासून प्रत्यक्ष राजापूरवासियांना याचा लाभ घेता येणार आहे. राजापूरवासियांनी प्रवासी संख्या वाढवावी व ही रेल्वे सेवा नियमित करण्यासाठी सहकार्य करावे असे प्रवासी संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. राजापूर तालुक्याला ऐतिहासिक पार्वभूमि असून प्रसिद्ध राजापूरची गंगा,जैतापूरचा अणूऊर्जा प्रकल्प, आडीवऱ्याची महाकाली,धुतपापेश्वर मंदिर अशी अनेक प्रेक्षणिय स्थळे पाहण्यासाठी अनेक पर्यटकांची मोठी वर्तळ सुरू असते,तसेच हे तालुक्यातील मोठे स्टेशन असल्याने प्रवासी संख्या मोठी आहे,यासाठी प्रवासी संघटने सोबतच माता पुर्वादेवी ग्रामविकास मंडळ मुंबई रजि.ह्या स्थानिक संस्थेनेही कोकण रेल्वे,माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे,खासदार नारायण राणे ,रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व विद्यमान स्थानिक आमदार किरण सामंत यांच्याकडे प्रवासी संघटनेसह स्थानिक रहिवाश्यांनी सतत पाठपुरावा केला होता याचेच हे यश असल्याचे प्रवासी संघटनेचे सेक्रेटरी यशवंत जडयार यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement
Tags :

.