For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेतान्याहूंना होती कर्करोगाची गाठ

06:49 AM Apr 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
नेतान्याहूंना होती कर्करोगाची गाठ
Advertisement

स्वत:च केले आरोग्याचे गुपित उघड

Advertisement

वृत्तसंस्था/ जेरुसलेम

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आपला वैद्यकीय अहवाल सार्वजनिक करून जगाला धक्का दिला आहे. आपल्याला कर्करोगाची गाठ असल्याची माहिती देताना त्यांनी प्रथमच आपले आरोग्यविषयक गुपित उघड केले. नेहमीच युद्ध आणि राजनैतिक घडामोडींच्या केंद्रस्थानी असलेल्या नेतान्याहू यांनी आपण काही काळापासून एका छुप्या आरोग्य समस्येशी झुंज देत होतो असा खुलासा करत आता पूर्णपणे निरोगी आणि तंदुरुस्त असल्याचे सांगितले. वयाच्या 76 व्या वर्षीही त्यांची तंदुरुस्ती आणि कामाप्रती असलेली निष्ठा पाहून तज्ञ चकित झाले आहेत. कर्करोगाची गाठ असल्याचे समजताच नेतान्याहू यांनी तात्काळ लक्ष्यित उपचार सुरू केले. तज्ञांच्या देखरेखीखाली झालेल्या या उपचारानंतर ती गाठ आता पूर्णपणे नाहीशी झाली आह. आता ते पूर्णपणे कर्करोगमुक्त झाले आहेत.

Advertisement

नेतान्याहू यांच्या वैद्यकीय अहवालानुसार, काही काळापूर्वी त्यांच्या प्रोस्टेटमध्ये एक लहान डाग आढळून आला होता. डॉक्टरांनी सदर घातक गाठ सुरुवातीच्या टप्प्यातील असल्याची पुष्टी केली. त्यानंतर काही दिवसातच योग्य उपचाराअंती ही गाठ काढून टाकण्यात आली असून ते सध्या पूर्णपणे तंदुरुस्त आहेत.

Advertisement
Tags :

.