नेस्लेच्या नफ्यात 26 टक्के वाढ, लाभांशाची घोषणा
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी नेस्ले इंडिया यांनी मार्च अखेरच्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून वर्षाच्या आधारावर कंपनीने नफ्यामध्ये 26 टक्के वाढ नोंदविली आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत कंपनीने 1114 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला आहे. चौथ्या तिमाहीतील कंपनीचे नफ्यासंदर्भातील प्रदर्शन सर्वोत्त्कृष्ट राहिले आहे. याच दरम्यान कंपनीने प्रतिसमभाग 5 रुपये लाभांश देण्याची घोषणा केली आहे.
6747 कोटीचा मिळवला महसूल
कंपनीने मार्च अखेरच्या तीमाहीत 22 टक्के वाढीसह 6747 कोटींचा महसुल प्राप्त केला आहे. कंपनीने दोन अंकी वस्तुंच्या विक्रीमध्ये तिमाहीत वाढ नोंदविली आहे. या शिवाय जाहीरातांकरिता 50 टक्क्यांपेक्षा जास्त खर्च कंपनीने केला आहे. मार्च तिमाहीत एकूण विक्री आणि देशांतर्गत विक्री अनुक्रमे 23.4 टक्के, 23.1 टक्के वाढली आहे.
समभाग झळाळला
नेस्ले इंडियाच्या तीमाही निकालानंतर समभाग मंगळवारी दमदार तेजीत होता. 3 वाजता समभाग 6 टक्के वाढत 1366 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या एक महिन्यामध्ये समभाग 17 टक्के वाढला आहे. मंगळवारी एकाच दिवशी समभाग 100 रुपयांपेक्षा अधिक वाढला होता.