नेस्ले इंडियाची दमदार कामगिरी
06:29 AM Jan 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई :
Advertisement
एफएमसीजी क्षेत्रातील दिग्गज कंपनी नेस्ले इंडियाच्या समभागाने गेल्या महिनाभरामध्ये दमदार परतावा गुंतवणुकदारांना दिलेला दिसून आला. जानेवारी 2026 मध्ये पाहता हा समभाग अडीच टक्के इतका वाढला आहे. विशेष बाब ही की, सलग पाचव्या आठवड्यामध्ये समभाग तेजीवर स्वार झालेला आहे. या दरम्यान समभाग जवळपास 10 टक्के इतका वर चढला आहे. बुधवारी समभाग 0.2 टक्के वाढत 1321 रुपयांवर व्यवहार करत होता. येणाऱ्या काळामध्ये हा समभाग दीर्घकाळ पाहता 14 टक्क्यांपर्यंत तेजीत राहू शकतो, असा तज्ञांचा अंदाज आहे.
Advertisement
Advertisement