नेस्लेने कमावला 688 कोटीचा नफा
महसुलातही 3 टक्के वाढ, डिसेंबर तीमाहीचा निकाल जाहीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी नेस्ले इंडिया यांनी आर्थिक 2025 च्या तिसऱ्या तीमाहीतील निकाल जाहीर केला असून नफ्यामध्ये 4 टक्के वाढ नोंदविली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कंपनीने 688 कोटींचा नफा नोंदविला आहे. मागच्यावर्षी याच तीमाहीमध्ये कंपनीने 655 कोटी रुपयांचा नफा कमविला होता.
दुसरीकडे महसुलात देखील कंपनीने 3.90 टक्के वाढ नोंदविली आहे. 4779 कोटी रुपयांचा महसुल कंपनीने डिसेंबरच्या तीमाहीत प्राप्त केला आहे. मागच्यावर्षी याच अवधीत 4600 कोटी रुपयांचा महसुल कंपनीने प्राप्त केला होता. कंपनीने 4762 कोटी रुपयांच्या वस्तुंची विक्री केली आहे. किंमत आणि मागणी वाढीमुळे तिसऱ्या तीमाहीमध्ये कंपनीला चांगली कामगिरी नोंदविता आली आहे. खाद्य महागाई, शहरी भागामध्ये परतलेली मागणी, त्याच प्रमाणे ग्रामीण भागातही आशादाई वाढलेली वस्तुंची मागणी त्या पार्श्वभूमीवर कंपनी चौथ्या तीमाहीतही चांगली कामगिरी करेल, असी अपेक्षा कंपनीचे चेअरमन सुरेश नारायणम् यांनी व्यक्त केली आहे.