For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेस्लेचे सीईओ मार्क यांचा 8 वर्षांनंतर राजीनामा

06:45 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
नेस्लेचे सीईओ मार्क यांचा 8 वर्षांनंतर राजीनामा
Advertisement

त्यांची जागा लॅटिन अमेरिकेचे बॉस लॉरेंट फ्रीक्स घेणार?

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

नेस्लेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क श्नाइडनर यांनी आठ वर्षांच्या पदावर राहिल्यानंतर स्विस फूड ग्रुपचा राजीनामा दिला आहे. त्यांची जागा लॅटिन अमेरिकेचे बॉस लॉरेंट फ्रीक्स घेतील, असे कंपनीने म्हटले आहे, कारण मार्क श्नाइडरने सीईओ आणि संचालक मंडळाच्या भूमिकेतून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. एका निवेदनात, मार्क श्नाइडनर म्हणाले की, ‘गेल्या 8 वर्षांपासून नेस्लेचे नेतृत्व करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आम्ही नेस्लेला भविष्यासाठी तयार, नाविन्यपूर्ण बनवल्यामुळे आम्ही जे काही साध्य करू शकलो त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.

Advertisement

नेस्लेचे नवीन सीईओ कोण?

नेस्लेचे नवीन सीईओ आता लॉरेंट फ्रीक्स आहेत. लॉरेंट फ्रीक्स 1986 मध्ये फ्रान्समधील नेस्लेमध्ये सामील झाले आणि 2008 च्या आर्थिक संकटादरम्यान आणि 2014 पर्यंत कंपनीचे युरोपीय क्षेत्र यशस्वीपणे व्यवस्थापित केले. त्यानंतर 2022 मध्ये नव्याने तयार केलेल्या लॅटिन अमेरिका झोनचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी त्यांची अमेरिका क्षेत्राचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Advertisement
Tags :

.