धारदार शस्त्राने मानेवर वार करून पुतण्याकडून चुलत काकाचा खून
खाजोर्डा-बोरी येथील घटनेने खळबळ : खुनानंतर संशयित फरार, दुसरा भाऊ ताब्यात : क्षुल्लक कारणावरून झाला होता वाद
शिरोडा : खाजोर्डा-बोरी येथे पुतण्याने आपल्या चुलत काकाच्या मानेवर धारदार शस्त्राने अत्यंत क्रूरपणे वार कऊन खून केल्याच्या घटनेमुळे खळबळ माजली आहे. काल रविवारी सायंकाळी घराच्या अंगणातच क्षुल्लक कारणावऊन हा खून करण्यात आला. दीपक राया नाईक (58) असे मयत व्यक्तीचे नाव असून मुख्य संशयित गौरेश कुशन नाईक (22) हा घटनेनंतर शस्त्रासह फरार झाला आहे. मयत दीपक यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रसंगी सहभागी असल्याच्या संशयावऊन साईदीप कुशन नाईक (24) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रक्ताच्या थारोळ्यात अंगणात पडला होता मृतदेह
मयत दीपक नाईक व संशयित गौरेश नाईक हे खाजोर्डा वाड्यावर एकाच घरात पण वेगवेगळ्या खोल्यांत राहत आहेत. या घटनेच्या दोन दिवसांपूर्वी काका व चुलत पुतण्यामध्ये काही क्षुल्लक कारणावऊन वाद झाला होता. संशयित गौरेश हा त्याचाच राग डोक्यात धऊन बसला होता. रविवारी सायंकाळी दीपक व त्याची पत्नी दीपा या घराच्या छप्पराची शाकारणी केल्यानंतर फुटलेली कौले बाजूला काढण्याच्या कामात गुंतली होती. यावेळी पाठिमागून आलेल्या गौरेशने दीपक याच्यावर अचानकपणे हा हल्ला केला. हातातील कुऱ्हाडसदृश धारदार हत्याराने पाठीमागून दीपकच्या कानशिलाजवळ जोरदार वार केला. या जोरदार प्रहारामुळे तो खाली कोसळला असता पुन्हा त्याच्या गळ्यावर वार केल्याने तो जागीच गतप्राण झाला. दीपकच्या पत्नीचा आरडा ओरडा ऐकून घरातील इतर मंडळी अंगणात धावून आली. तेव्हा दीपक हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता व संशयिताने दीपकच्या दुसऱ्या भावावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला व परिस्थितीचे भान येताच तो तेथून पसार झाला.
दोन दिवसांपूर्वी झाले होते भांडण
मयत दीपक यांच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार क्षुल्लक कारणावऊन संशयित गौरेश याच्याशी वाद झाला होता. नाईक कुटुंबीयांचे बोरी भागात जाईचे मळे आहेत. जाईच्या कळ्या गुंफण्यासाठी वापरण्यात येणारा केळीच्या गोब्याचा दोर वाळत टाकला होता. तो कुणीतरी गायब केल्याने दीपक यांनी गौरशच्या कुटुंबीयांना त्याबद्दल जाब विचारल्याने दोन्ही कुटुंबात भांडण झाले होते. कदाचित त्याचा राग डोक्यात ठेऊन गौरेशने आपल्या चुलत काकाचा अशाप्रकारे काटा काढला असावा, असे बोलले जाते. सध्या संशयित गौरेश हा फरार असल्याने तो पोलिसांना सापडल्यानंतर या खुनामागील नेमके कारण व हेतू स्पष्ट होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच फोंड्याचे उपअधीक्षक शिवराम वायंगणकर, निरीक्षक मोहन गावडे तसेच इतर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेच्या मुख्य साक्षीदार असलेल्या मयत दीपक नाईक यांच्या पत्नी व अन्य कुटुंब सदस्यांच्या पोलिसांनी जबान्या घेतल्या. फॉरेन्सिक पथकाला पाचारण कऊन पंचनामा व अन्य सोपस्कार पूर्ण केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शवागारात ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयित गौरेश हा तसा गावात वादग्रस्त असून छोट्यामोठ्या भांडणामुळे तो वारंवार चर्चेत असतो. आता खूद्द चुलत काकाचाच निर्घृणपणे खून कऊन गुन्ह्याचे टोक त्याने गाठले आहे.
पत्नी व मुलीचा आधार हरपला
मयत दीपक नाईक हा सुस्वभावी व मनमिळावू होता. बोरीतील खाडीत पांरपरिक पद्धतीने मासेमारी कऊन व पावसाळ्यात जाईच्या फुलांची लागवड कऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या पश्चात पत्नी व इयत्ता आठवीत शिकणारी अकरा वर्षांची मुलगी आहे. दीपक याच्या मृत्यूमुळे घरातील कमावता आधार गेल्याने कुटुंबावर आभाळ कोसळले आहे.