महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाचा आकाश आनंद मायावतींचा उत्तराधिकारी! लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची बांधणी

06:10 AM Dec 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बसपा प्रमुखांच्या धाकट्या भावाचा मुलगा : सध्या पक्षाचा राष्ट्रीय समन्वयक

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

Advertisement

बहुजन समाज पक्षाच्या बैठकीत बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी मोठी घोषणा करत आपला भाचा आणि पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. 67 वर्षीय मायावतींनी आता पक्षाची कमान 27 वर्षीय आकाश आनंदच्या हाती दिली आहे. सध्या, मायावती उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पक्षाची धुरा सांभाळतील, तर आकाश उर्वरित 26 राज्ये पाहतील. मायावतींनी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची तयारी पाहण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत बसपाला मजबूत करण्याची जबाबदारीही आकाश यांच्याकडे सोपवली आहे.

मायावतींनी आपला संपूर्ण वारसा भाचा आकाश आनंदकडे सोपवला आहे. रविवार, 10 डिसेंबर रोजी लखनौमध्ये बसपा पक्षाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. आता जवळच येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मायावतींनी महत्त्वपूर्ण निर्णय घेत उत्तराधिकारी जाहीर केला. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड वगळता संपूर्ण देशाची जबाबदारी आकाश आनंदकडे सोपवण्यात आली आहे. इतर राज्यांतील लोकसभा निवडणुकीसाठी आकाश पक्ष मजबूत करेल. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आकाश आनंदने अतिशय सक्रिय भूमिका बजावली होती.

मायावती यांनी आकाश आनंद (भाचा) यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केल्याचे बहुजन समाज पार्टी नेते उदयवीर सिंह यांनी प्रसारमाध्यमांना अधिकृतपणे सांगितले. आकाश आनंद लवकरच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची स्थिती कमकुवत असलेल्या ठिकाणी तयारीचा आढावा घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आकाश आनंद यांच्याकडे पक्षाचे नेते म्हणून बसप अध्यक्षपदाची जबाबदारी घेणारी व्यक्ती म्हणून पाहिले जात होते. गेल्या वर्षभरापासून ते पक्षाच्या कारभाराची जबाबदारी सांभाळत असल्याचेही म्हटले जात होते. आकाश आनंद हा मायावतींचा धाकटा भाऊ आनंद कुमार यांचा मुलगा आहे. त्यांना बसपमध्ये ‘बहनजी’ नंतरचे सर्वोच्च नेते मानले जाते. 2019 मध्ये मायावती यांचे भाऊ आनंद कुमार यांना पक्षाचे उपाध्यक्ष आणि आकाश आनंद यांना राष्ट्रीय समन्वयक बनवण्यात आले होते.

उच्चशिक्षित राजकारणी

आकाश आनंद हा बसपाच्या राजकारणात नवीन चेहरा नाही किंवा त्यांचा प्रवेश अचानक झालेला नाही. 2017 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर बसपा प्रमुख मायावती यांनी सहारनपूरमध्ये एका सभेत त्यांची ओळख करून दिली होती. आगामी काळात आकाश आनंद यांची पक्षातील भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असा संदेशही माजी मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये दिला होता. त्यानंतर त्यांनी वेळोवेळी पक्षासाठी निर्णायक कार्य बजावल्यामुळे मायावतींनी त्यांना आपला उत्तराधिकारी घोषित केले. आकाश आनंद यांनी लंडनमधील एका मोठ्या महाविद्यालयातून एमबीएची पदवी मिळवली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article