For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेपाळ पंतप्रधानपदी के. पी. शर्मा ओली

06:09 AM Jul 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
नेपाळ पंतप्रधानपदी के  पी  शर्मा ओली
Nepal Prime Minister K. P. Sharma Oli
Advertisement

वृत्तसंस्था / काठमांडू

Advertisement

खड्गप्रसाद शर्मा ओली यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे. सोमवारी त्यांचा शपथविधी पार पडला. ते या देशाच्या सर्वात मोठ्या साम्यवादी पक्षाचे नेते आहेत. नेपाळचे राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांनी शर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. अशा प्रकारे या देशात सत्तातराची प्रक्रिया पार पडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शर्मा ओली यांची नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन पेले आहे. शर्मा यांच्या नेतृत्वात भारत आणि नेपाळ यांच्या संबंधांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात व्यक्त केला आहे. इतर देशांच्या प्रमुखांनीही शर्मा यांचे अभिनंदन केले आहे. हिमालयातील या देशात राजकीय स्थिरता आणण्याचे सर्वात मोठे आव्हान खड्गप्रसाद शर्मा ओली यांना आता पेलावयाचे आहे.

Advertisement

नेपाळी काँग्रेसच्या समर्थनाने...

माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांचे सरकार नुकतेच कोसळल्यानंतर शर्मा यांचे सरकार या देशात स्थानापन्न होत आहे. या सरकारला नेपाळमधील सर्वात मोठा पक्ष नेपाळी काँग्रेसचा पाठिंबा आहे. या पक्षाने नेते शेरबहादुर देऊबा हे आहेत. त्यांनी आधी प्रचंड यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने ते सरकार कोसळले होते. आता नव्या युतीचे सरकार या देशात आले आहे.

बहुमत सिद्धतेची अट

नेपाळच्या घटनेतील नियमानुसार आता शर्मा ओली यांना येत्या 30 दिवसांमध्ये बहुमत सिद्ध करुन दाखवावे लागणार आहे. त्यांना नेपाळी काँग्रेसचा पाठिंबा असल्याने ते विनासायास बहुमत सिद्ध करु शकतात. मात्र, त्यांचेही सरकार अस्थिरच आहे. कारण त्यांना मित्रपक्षाकडून धोका होऊ शकतो. त्यामुळे नव्या सरकारच्या स्थापनेनंतरही अस्थिरतेचे ढग राहणार आहेत, असे तज्ञांचे मत आहे.

Advertisement
Tags :

.