For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेपाळमध्ये पुराच्या थैमानानंतर बचावकार्य वेगात;11हजारांहून अधिक नागरिकांची सुटका

11:55 AM Sep 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
नेपाळमध्ये पुराच्या थैमानानंतर बचावकार्य वेगात 11हजारांहून अधिक नागरिकांची सुटका
Advertisement

काठमांडू : नेपाळमध्ये मुसळधार पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीनंतर सरकारने बचाव आणि शोधमोहीम अधिक तीव्र केली आहे. आतापर्यंत 11हजारांहून अधिक नागरिकांची सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

पूरग्रस्त भागांमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी सुरक्षा दल, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पुराच्या पाण्यामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले असून, रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेलाही मोठा फटका बसला आहे.

दरम्यान, बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. दुर्गम आणि पुराचा मोठा फटका बसलेल्या भागांमध्ये बचाव पथके पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिस्थितीवर सरकारकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

पुरानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत मदत आणि बचावकार्याला प्राधान्य देण्यात आले असून, प्रभावित नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement
Tags :

.