For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

येत्या नवीन शैक्षणिक वर्षात पहिली ते दहावीपर्यंत ‘एनईपी’

12:51 PM Feb 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
येत्या नवीन शैक्षणिक वर्षात पहिली ते दहावीपर्यंत ‘एनईपी’
Advertisement

एससीईआरटीतर्फे परिपत्रक जारी

Advertisement

पणजी : आगामी शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) सर्व पहिली ते दहावी इयत्तांना लागू करण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून एनईपीची गोव्यात पूर्णपणे कार्यवाही होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विद्यमान शैक्षणिक वर्षात म्हणजे 2025-26 मध्ये इयत्ता तिसरी ते सहावी, नववी ते दहावी याकरीता एनईपी राबवण्यात आले. आता ते धोरण पहिली, दुसरी, चौथी, पाचवी, सातवी, आठवी या सर्व इयत्तांना पुढील 2026-27 वर्षात लागू करण्यात येणार आहे. गोवा राज्य शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण अर्थात एससीईआरटीतर्फे त्यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचे एनईपीप्रमाणे मूल्यांकन होणार असून त्यांना नवीन विकसित केलेली पुस्तके एससीईआरटीतर्फे देण्यात येणार आहेत. त्या धोरणात कला, कारागिरी, क्रीडा, योग, वाचणे, गार्डनिंग यासारखे नवीन विषय समाविष्ट करण्यात आले आहेत. सदर धोरणानुसार 40 मिनिटांचा एक शिकवणी वर्ग निश्चित करण्यात आला असून सहावी ते आठवी वर्गासाठी काही विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे. त्यासाठी बाहेरील परीक्षक नेमले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. गोवा राज्यातील शिक्षण क्षेत्रात गेल्या दोन वर्षापासून एनईपीची तयारी चालू होती. सर्व इयत्तांचे शिक्षक - पालक आणि संबंधितांना विश्वासात घेऊन ते एनईपी धोरण लागू केल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.