For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेमळेत दुष्काळसदृश परिस्थितीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; ‘जलतारा’ उपक्रमाचा शुभारंभ

11:42 AM Sep 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
नेमळेत दुष्काळसदृश परिस्थितीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी  ‘जलतारा’ उपक्रमाचा शुभारंभ
Advertisement

नेमळे : नेमळे गावातील दुष्काळसदृश परिस्थितीची जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. भात पिकाची लागवड झाल्यानंतर पावसाने ओढ दिल्याने पिकांचे होत असलेले नुकसान तसेच स्थानिक ओढ्यांमधील घटलेली पाण्याची पातळी याची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली.

Advertisement

पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी आणि दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी गावांमध्ये वनराई बंधारे आणि कच्चे बंधारे तातडीने उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले. ग्रामीण भागातील भूजलपातळी वाढवण्यासाठी जलसंधारणाच्या उपाययोजनांना प्राधान्य देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रत्येक ग्रामपंचायतीत ‘जलतारा’ उपक्रम

जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी ‘जलतारा’सारखे जलसंधारण प्रकल्प प्रभावी ठरू शकतात, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी अशा प्रकल्पांची ग्रामपंचायत स्तरावर मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Advertisement

यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते तालुक्यातील ‘जलतारा’ उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.

या पाहणी दौऱ्यात सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक, उपविभागीय अधिकारी वीरसिंग वसावे, गटविकास अधिकारी निलेश जाधव, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता सुदेश राणे, तसेच नेमळे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.