Kolhapur : किरकोळ कारणातून शेजाऱ्यास बांबूने मारहाण ; शाहूपुरी पोलिसात नोंद
03:10 PM Oct 13, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement
किरकोळ वादाचे रूपांतर हिंसाचारात
Advertisement
कोल्हापूर : किरकोळ कारणातून शेजाऱ्यानेच शेजाऱ्यास बांबूने मारहाण केली. यामध्ये फिर्यादी दिलीप वामन कवडे (वय ४७ रा. सदर बाजार) हे जखमी झाले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमोल साळोखे (रा. सदर बाजार) गुन्हा दाखल करण्यात आला.
शनिवार (११ ऑक्टोबर) रोजी सकाळी सदर बाजार येथील गवळी गल्लीत घडली. शनिवारी सकाळी दिलीप कवडे व त्यांच्या पत्नीची किरकोळ कारणातून वाद सुरु होता. हा वाद सुरु असतानाच अचानकपणे अमोल साळोखे याने दिलीप कवडे यांच्या घरी घुसून त्यांना मारहाण केली. या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली.
Advertisement
Advertisement