नेहा हिरेमठच्या कुटुंबीयांनी घेतली अमित शहा यांची भेट
10:39 AM May 02, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर : हुबळीतील बीव्हीबी महाविद्यालयात हत्या झालेल्या नेहा हिरेमठ हिच्या कुटुंबीयांनी बुधवारी हुबळी येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी नेहाच्या कुटुंबीयांनी अमित शहा यांना निवेदन देऊन न्याय देण्याची विनंती केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हुबळी येथे प्रचारासाठी आले होते. यावेळी भाजप नेते अरविंद बेल्लद यांच्या नेतृत्त्वाखाली नेहा हिरेमठ हिचे वडील निरंजन, आई गीता, भाऊ निहाल यांनी अमित शहा यांची भेट घेतली. नेहाची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. आम्हाला न्याय मिळवून द्या, अशा विनंतीचे निवेदन दिले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजप आमदार महेश टेंगिनकाई उपस्थित होते.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article