For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी रेल्वे स्टेशनसमोरील खड्डयामुळे अपघाताची शक्यता

12:51 PM Sep 14, 2025 IST | अनुजा कुडतरकर
सावंतवाडी रेल्वे स्टेशनसमोरील खड्डयामुळे अपघाताची शक्यता
Advertisement

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

Advertisement

न्हावेली/वार्ताहर

सावंतवाडी रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच असलेल्या एका मोठ्या खड्डयामुळे प्रवाशांच्या आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.या खड्डयांमुळे लहान मोठे अपघात होण्याची शक्यता असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.सावंतवाडी रेल्वे स्टेशन हे एक महत्वाचे ठिकाण आहे.येथे दररोज शेकडो प्रवासी आणि पर्यटक ये-जा करतात.पण स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोरच अनेक दिवसांपासून हा खड्डा असल्याने सर्वानाच मोठा त्रास सहन करावा लागत आहे.दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना हा खड्डा चुकवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.ज्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताचा धोका वाढला आहे.स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार हा खड्डा अनेक दिवसांपासून आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रार करुनही यावर कोणतीही तात्काळ कार्यवाही केली गेलेली नाही.त्यामुळे प्रशासनाच्या या उदासिनतेवर तीव्र संताप व्यक्त होत आहे.प्रवाशांनी आणि स्थानिक नागरिकांनी या परिस्थितीवर त्वरित लक्ष देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने या खड्डयाची दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी केली आहे.जर यावर त्वरित कारवाई झाली नाही तर या खड्डयांमुळे होणार्‍या कोणत्याही संभाव्य अपघाताची जबाबदारी बांधकाम विभागाची असेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.