For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घरावर पडलेला वीज पोल चार दिवसांनंतरही तसाच

01:33 PM May 26, 2026 IST | अनुजा कुडतरकर
घरावर पडलेला वीज पोल चार दिवसांनंतरही तसाच
Advertisement

कलंबिस्त - पास्तेवाडी येथील घटना ; वीज वितरण अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

Advertisement

सावंतवाडी : प्रतिनिधी

रविवारी पहाटे सह्याद्री पट्ट्यात झालेल्या वादळी पावसाचा फटका सर्वसामान्य ग्रामीण वीज ग्राहकांना बसत असताना वीज वितरण यंत्रणेला काहीच सोयरसुतक नसल्याचा प्रत्यय सध्या येत आहे .तालुक्यातील कलंबिस्त पास्तेवाडी येथील राघवेंद्र तावडे यांच्या घरावर विजेचा पोल तुटून पडला मात्र , गेले चार दिवस उलटून गेले तरी वीज वितरणचे अधिकारी तावडे यांच्या घरी फिरकले देखील नाहीत त्यामुळे वीज वितरणाच्या कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे . चार दिवसापूर्वीच सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक यांनी वीज कर्मचारी मुजोरगिरी करत आहेत असे वक्तव्य केले होते . मात्र आता याचा प्रत्यय जनतेलाही अनुभवायला मिळत आहे . कलंबिस्त ग्रामपंचायत सदस्य दीपक जाधव यांनी आज सकाळी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात जाऊन जाब विचारला . कलंबिस्त येथील जवळपास 40 घरे गेले चार दिवस अंधारात असून वीज पोल घरावर पडून तसाच आहे त्यामुळे आता आंदोलनात्मक पवित्र घ्यावा लागेल असा इशारा त्यांनी वीज वितरण अधिकाऱ्यांना दिला आहे . दुसरीकडे वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय लाड यांनी काल संध्याकाळी याबाबत वीज अधिकाऱ्यांना कळवूनही त्यांच्या शब्दाला केराची टोपली दाखवली गेली आहे . त्यामुळे वीज वितरणने दिशाभूल करणे थांबवावे अशी मागणी जनतेतून होत आहे .

Advertisement

Advertisement
Tags :

.