चिदंबरनगर येथील कचऱ्याची उचल करण्याकडे दुर्लक्ष
10:35 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : शहर आणि उपनगरातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. महानगरपालिकेकडून कचऱ्याची उचल केली जात आहे असे सांगितले जात असले तरी अद्यापही ठिकठिकाणी मिनी कचरा डेपो निर्माण झाल्याची स्थिती पहावयास मिळत आहे. चिदंबरनगर येथे रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा पडून असला तरीही त्याची उचल करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांनी रस्त्याच्या कडेला किंवा उघड्यावर कचरा टाकू नये. घरोघरी येणाऱ्या घंटागाडीकडेच कचरा द्यावा, असे आवाहन केले जात आहे. पण प्रत्यक्षात घंटागाडी सुरळीत आणि वेळेत येत नसल्याच्या तक्रारी आहेत. कचऱ्यावर भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. विशेष करून चिदंबरनगर येथे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग पडून आहेत. पण त्याची उचल करण्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे.
Advertisement
Advertisement