For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील कचरा उचल करण्याकडे दुर्लक्ष

12:36 PM May 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील कचरा उचल करण्याकडे दुर्लक्ष
Advertisement

बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुशोभिकरणावेळी तेथील झाडांच्या फांद्या तोडून टाकण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सोसाट्याचा वारा आणि वळीव पावसामुळेही झाडांच्या फांद्या मोडून पडल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात फांद्या व पालापाचोळा पडून असला तरीही त्याची उचल करण्याकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

Advertisement

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील सिटी सर्व्हे कार्यालयाची इमारत हटविण्यात आली आहे. सदर कार्यालयाचे अन्यत्र स्थलांतर करून जिल्हाधिकारी कार्यालयाचे सुशोभिकरण केले जात आहे. सुशोभिकरणाचे काम करताना तेथील कोणत्याही झाडावर कुऱ्हाड चालविण्यात आली नाही. मात्र धोकादायक व खाली आलेल्या फांद्या छाटून टाकण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून फांद्या व पालापाचोळा त्याच ठिकाणी पडून आहे.

कचरा उचल करण्याची मागणी

Advertisement

या मार्गावर न्यायालय, प्रादेशिक आयुक्त कार्यालय, जिल्हा पंचायत, माहिती व प्रसार खाते, तालुका पंचायत, प्रांताधिकारी, लोकायुक्त कार्यालय, उपनोंदणी यासारखी महत्त्वाची शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे दैनंदिन कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय असून, याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने याकडे लक्ष देऊन पडून असलेल्या कचऱ्याची उचल करावी, अशी मागणी केली जात आहे.

Advertisement
Tags :

.