For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

देशभरात आज नीट परीक्षा

06:34 AM May 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
देशभरात आज नीट परीक्षा
Advertisement

बेळगावच्या विद्यार्थ्यांना दूरवरची परीक्षा केंद्रे

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

नॅशनल टेस्टींग एजन्सी (एनटीए) च्यावतीने घेण्यात येणारी नीट-2024 परीक्षा रविवार दि. 5 रोजी होणार आहे. बेळगाव जिल्ह्यातही अनेक केंद्रांवर परीक्षा होणार असल्याने परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुपारी 2 ते सायंकाळी 5.20 यावेळेत परीक्षा असली तरी सकाळी 11 पर्यंत परीक्षा केंद्रांवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Advertisement

वैद्यकीयसह इतर अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्यासाठी नीट परीक्षा उत्तीर्ण असणे महत्त्वाचे आहे. यावर्षी देशामध्ये 24 लाख विद्यार्थी नीट परीक्षा देणार आहेत. 577 शहरांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश मिळावा यासाठी मागील वर्षभरापासून विद्यार्थी नीटची तयारी करीत होते. संपूर्ण देशात एकाचवेळी नीट परीक्षा घेतली जाते.

बेळगावमधील अनेक विद्यार्थ्यांना विजापूर जिल्ह्यात परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. बेळगावपासून 212 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या विजापूर जिल्ह्यात परीक्षा केंद्र असल्याने विद्यार्थी व पालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी शनिवारी रात्रीच परीक्षा केंद्राजवळील शहरात राहणे पसंत केले. तसेच बेळगाव जिल्ह्यातही अथणी, रायबाग, बैलहोंगल, रामदुर्ग, सौंदत्ती अशा दूरवरच्या गावांमध्ये परीक्षा केंद्रे देण्यात आल्याने विद्यार्थ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

Advertisement
Tags :

.