For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नीरजची ब्रँड व्हॅल्यू 335 कोटींवर

06:22 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
नीरजची ब्रँड व्हॅल्यू 335 कोटींवर
Advertisement

ऑलिम्पिकमधील रौप्यपदकाने घसघशीत कमाई : हार्दिक पंड्यालाही टाकले मागे

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताचा दिग्गज भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले, यानंतर त्याच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये मोठी वाढ झाली आहे. एका आर्थिक अहवालानुसार नीरजची ब्रँड व्हॅल्यू 335 कोटी रुपयांवर गेली आहे. आता या बाबतीत त्याने स्टार क्रिकेटपटू हार्दिक पंड्याला मागे टाकले आहे. पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी हार्दिक (318 कोटी) आणि नीरजची ब्रँड व्हॅल्यू जवळपास सारखीच होती. मात्र ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर नीरजला मोठा फायदा झाला आहे.

Advertisement

भारतात नीरज चोप्रा सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेला नॉन क्रिकेटर आहे.  नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं होते, यानंतर त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावले आहे. ऑलिम्पिकपूर्वी नीरजची ब्रँड व्हॅल्यू भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सारखीच होती, पण आता तो त्याच्याही पुढे गेला आहे. हार्दिकची ब्रँड व्हॅल्यू सुमारे 318 कोटी इतकी आहे. पण लागोपाठ दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर नीरजचा मार्केटमध्ये भाव चांगलाच वधारला आहे. भारतीय सैन्यदलात सुभेदार असलेल्या नीरजच्या ब्रँड व्हॅल्यूत तब्बल 30 ते 40 टक्के वाढ झाली आहे. ऑलिम्पिकआधी एका जाहिरातीसाठी तो 3 ते 4 कोटी रुपये घेत असे, पण आता त्यामध्ये वाढ होऊन ती 25 ते 30 कोटीरुपयापर्यंत गेली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पॅरिस ऑलिम्पिकनंतर पॅकेज्ड फूड, आरोग्य, पोषण, दागिने, बँकिंग आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक कंपन्या नीरजशी करार करण्यास उत्सुक आहेत.

नेमबाज मनू भाकरही आघाडीवर

नेमबाज मनू भाकरनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदके जिंकली. यानंतर तिच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये देखील मोठी वाढ होत आहे. एका रिपोर्टनुसार, पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी मनू भाकर एका जाहिरातीसाठी 25 लाख रुपये घेत होती. आता हिच किंमत 1.5 कोटी पेक्षा जास्त झाली आहे. भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहलीची ब्रॅन्ड व्हॅल्यू सर्वाधिक आहे. तो 1912 कोटी रुपयांच्या ब्रॅन्ड व्हॅल्यूसह अव्वल क्रमांकावर आहे.

अव्वल ब्रँड व्हॅल्यू असलेले भारतीय खेळाडू

  1. विराट कोहली - 1912 कोटी
  2. महेंद्रसिंह धोनी - 765 कोटी
  3. सचिन तेंडुलकर - 760 कोटी
  4. रोहित शर्मा - 343 कोटी
  5. नीरज चोप्रा - 335 कोटी
  6. हार्दिक पंड्या - 318 कोटी
  7. पीव्ही सिंधू - 234 कोटी
  8. केएल राहुल - 209 कोटी
  9. सायना नेहवाल - 167 कोटी
  10. सुनील छेत्री - 150 कोटी
Advertisement
Tags :

.