For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फेडरेशन कपमध्ये नीरज चोप्रा, किशोरकुमार जेना सहभागी होणार

06:51 AM May 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
फेडरेशन कपमध्ये नीरज चोप्रा  किशोरकुमार जेना सहभागी होणार
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

ऑलिम्पिक आणि जागतिक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राने भुवनेश्वर येथे 12 ते 15 मेदरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय फेडरेशन कपमधील आपला सहभाग निश्चित केला असून त्यामुळे मागील तीन वर्षांत प्रथमच तो घरच्या मैदानावर स्पर्धा करताना दिसणार आहे.

10 मे रोजी प्रतिष्ठित डायमंड लीग मालिकेच्या पहिल्या टप्प्याने मोसम सुरू केल्यानंतर हा 26 वर्षीय सुपरस्टार दोहाहून भारतात येण्याची अपेक्षा आहे. प्रवेशिकांनुसार, चोप्रा आणि किशोरकुमार जेना हे भुवनेश्वर येथे 12 मेपासून सुरू होणाऱ्या देशांतर्गत स्पर्धेत भाग घेणार आहेत, असे भारतीय अॅथलेटिक्स महासंघाने ट्विट करून कळविले आहे.

Advertisement

प्रशिक्षक क्लॉस बारटोनिट्झ यांनीही नीरज चोप्रा भुवनेश्वरमधील स्पर्धेत उतरणार याची पुष्टी केलेली आहे. 28 वर्षीय किशोर जेनाने हांगझाऊ आशियाई क्रीडास्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. त्याच ठिकाणी चोप्राने सुवर्णपदक जिंकले होते. जेना देखील 10 मे रोजी दोहा डायमंड लीगमध्ये भाग घेणार आहे. चोप्राने शेवटच्या वेळी म्हणजे 17 मार्च, 2021 रोजी याच देशांतर्गत स्पर्धेत भाग घेतला होता. तेव्हा त्याने 87.80 मीटर इतक्या अंतरावर भाला फेकून सुवर्ण जिंकले होते.

Advertisement
Tags :

.