For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नीरज चोप्रा पुन्हा नंबर 1!

06:57 AM Jun 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
नीरज चोप्रा पुन्हा नंबर 1
Advertisement

 जागतिक भालाफेकीच्या ताज्या यादीत ग्रेनेडेचा अँडरसन, पाकिस्तानच्या अर्शद नदीमला टाकले मागे

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारताचा दिग्गज भालाफेकपटू नीरज चोप्रा विविध पराक्रम मैदानात करताना दिसत असतो. गेलं वर्ष त्याच्यासाठी चढ-उतारांचं राहिलं असलं तरी या वर्षात त्याने सुरुवातीपासूनच शानदार कामगिरी केली आहे. नीरजने यंदाच्या हंगामात आतापर्यंत दोन जेतेपद पटकावली आहेत. या कामगिरीच्या जोरावर नीरजने पुन्हा एकदा भालाफेकीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, तब्बल 9 महिन्यांनंतर त्याने अव्वल क्रमांक पटकावला आहे.

Advertisement

नीरजने ग्रेनडाच्या अँडरसन पीटर्सला मागे टाकून अव्वल क्रमांक मिळवला. त्याने केवळ अँडरसनलाच नाही, तर ज्युलियन वेबर, अर्शद नदीम आणि जेकब वेडलेच यांनाही मागे टाकले आहे. पाकिस्तानचा अर्शद नदीम जो सध्याचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आहे, तो चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. ताज्या क्रमवारीनुसार नीरजचे आता 1445 गुण आहेत, तर अँडरसनचे 1431 पाँइंट्स आहेत. तिसऱ्या क्रमांकावर ज्युलियन वेबर असून त्याने काही महिन्यांपूर्वी दोहा डायमंड लीगमध्ये 91.06 मीटर लांब भाला फेकला होता. चौथ्या क्रमांकावरील अर्शदचे 1370 पाँइंट्स आहेत. जेकब वेडलेच पाचव्या क्रमांकावर आहे.

यंदाच्या हंगामात नीरजच सरस

नीरज यापूर्वी सप्टेंबर 2024 मध्ये अव्वल क्रमांकावरून खाली घसरला होता. त्यावेळी अँडरसनने अव्वल क्रमांक मिळवला होता. गेल्या वर्षभरात त्याला सातत्याने दुखापतीचा सामना करावा लागला. अशातच तो पॅरिस ऑलिम्पिकही खेळला, ज्यात त्याने रौप्य पदक जिंकले पण दुखापतीमुळे त्याच्या कामगिरीवर परिणाम होत असल्याचे दिसत होते. अखेर त्याला अव्वल क्रमांक गमवावा लागला होता. यंदाच्या हंगामात मात्र तो जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. दुखापतीतून सावरत तंदुरुस्त होऊन त्याने जोरदार पुनरागमन केले. मे मध्ये दोहा डायमंड लीगमध्ये त्याने 90.23 मीटर लांब भाला फेकत नवा राष्ट्रीय विक्रम केला, पण त्यावेळी तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. यानंतर पॅरिस डायमंड लीगमध्येही 88.16 मीटर लांब भालाफेक करत अव्वल क्रमांक मिळवला. गत आठवड्यात ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत त्याने धमाकेदार कामगिरी करत यश खेचून आणले. दरम्यान, याच कामगिरीच्या जोरावर त्याने भालाफेकीच्या ताज्या यादीत अव्वलस्थान पटकावले आहे.

Advertisement
Tags :

.