नीरज चोप्रा क्लासिक आता 5 जुलै रोजी
वृत्तसंस्था / बेंगळूर
गेल्या महिन्यात भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षामुळे पुढे ढकलण्यात आलेला पहिली नीरज चोप्रा क्लासिक आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धा 5 जुलै रोजी येथे होणार असल्याची घोषणा आयोजकांनी मंगळवारी केली.
भारताची पहिली आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धा जी मुळात 24 मे रोजी नियोजित होती. ती दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेता चोप्रा जेएसडब्ल्यु स्पोर्ट्सच्या सहकार्याने आणि अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया (एएफआय) द्वारे मंजूर करुन आयोजित करत आहे. श्री कांतीरवा स्टेडियमवर होणाऱ्या या स्टार-स्टडेड 12 पुरुषांच्या स्पर्धेत जगातील सात सर्वोत्तम भालाफेकपटू आणि चोप्रासह पाच भारतीय सहभागी होतील. इतर चार भारतीयांमध्ये आशियाई अजिंक्यपदचा रौप्यपदक विजेता सचिन यादव, किशोर जेना, रोहित यादव आणि साहील सिलवाल यांचा समावेश आहे. या स्पर्धेसाठी परदेशी स्पर्धकांमध्ये दोन वेळा विश्वेविजेता अँडरसन पीटर्स (पीबी 93.07 मी.), ग्रॅनाडाचा 2016 ऑलिम्पिक सुवर्ण विजेता थॉमस रोहलर (पीबी 93.90 मी.), केनियाचा 2015 चा विश्वविजेता ज्युलियस येगो (92.72 मी.), अमेरिकन कर्टिस थॉम्पसन (पीबी: 87.76 मी.), आशियाई खेळांचा कांस्यपदक विजेता गेन्की डीन (पीबी: 84.28 मी.), श्रीलंकेचा रुपेश पाथिरेज (पीबी: 85.45 मी.), ब्राझीलचा लुईझ मॉरिसियो दा सिल्वा (पीबी: 86.34 मी.) यांचा समावेश आहे.
नीरज चोप्रा क्लासिकला लवकर व्हावी यासाठी प्रचंड सामुहिक प्रयत्न करावे लागले आहेत आणि आम्हाला 5 जुलै रोजी त्याचे पुनरागमन झाल्याची पुष्टी करताना आनंद होत आहे, असे जेएसडब्ल्यु स्पोर्ट्सचे मुख्य व्यावसायिक अधिकारी करण यादव म्हणाले. एएफआय, कर्नाटक ऑलिम्पिक असोसिएशन, कर्नाटक सरकार आणि आमच्या भागीदारांच्या अढळ पाठिंब्यामुळे हे शक्य झाले. या कार्यक्रमाभोवतीची उर्जा पूर्वीपेक्षाही मोठी आहे आणि आम्ही भालाफेकीचा उत्सव सादर करण्यास सज्ज आहोत जो अधिक धाडसी, चांगला आणि त्याहूनही अविस्मरणीय असेल. जागतिक अॅथलेटिक्सने श्रेणी अ दर्जा दिलेला हा कार्यक्रम थेट प्रक्षेपणासाठी अपुरी प्रकाशयोजना असल्यामुळे मूळ पंचकुलाच्या ठिकाणाहून बेंगळूरमधील कांतीरवा स्टेडियममध्ये हलविण्यात आला. चोप्राचा स्वप्नातील प्रकल्प म्हणून त्याची घोषणा मोठ्या उत्साहात करण्यात आली होती. परंतु पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सीमा तणावामुळे तो पुढे ढकलावा लागला. ज्यामध्ये 26 नागरिक, बहुतेक पर्यटक मारले गेले, असेही ते म्हणाले.
आयोजकांच्या मते या शोपीसच्या तिकिटांच्या किंमती 199 रुपयांपासून 9,999 रुपयांपर्यंत असतील. प्रीमियर अनुभवासाठी प्रत्येकी 15 पाहुण्यांना सामावून घेणारे पाच कॉर्पोरेट बॉक्स 44,999 रुपयांना उपलब्ध आहेत. थ्रोअरच्या धावपट्टीजवळील एका खास स्टँडची किंमत 9,999 रुपये आहे तर धावपट्टीच्या मागे असलेल्या नॉर्थ अप्पर स्टँडमधील आणखी एका खास स्टँडची किंमत 2,999 रुपये आहे.