For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निरज चोप्रा-झेलेन्झी विभक्त

06:32 AM Jan 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
निरज चोप्रा झेलेन्झी विभक्त
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

भारताचा अव्वल जागतिक दर्जाचा भालाफेकधारक निरज चोप्राला यापूर्वी झेकचे प्रशिक्षक जेन झेलेन्झी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत होते. झेलेन्झीच्या मार्गदर्शनाखाली निरज चोप्राने विविध स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी केली. झेलेन्झी केवळ एका वर्षाच्या अॅथलेटिक्स हंगामासाठी निरज चोप्राचे प्रशिक्षक आणि मार्गदर्शक होते. आता त्यांच्यातील करार संपुष्टात आला आहे.

निरज चोप्रा आणि झेलेन्झी यांच्यातील हा करार कोणत्या कारणास्तव संपुष्टात आला, याचा मात्र खुलासा चोप्राने केलेला नाही. झेलेन्झीच्या मार्गदर्शनाखाली निरज चोप्राने गेल्यावर्षी भालाफेक प्रकारात 90 मी.चा टप्पा ओलांडला होता. निरज चोप्राने या क्रीडा प्रकारात आपल्या कामगिरीत सातत्य राखताना दोन वेळा ऑलिम्पिक पदके मिळविली आहेत. 2028 च्या लॉस एन्जिल्स ऑलिम्पिक स्पर्धेत या क्रीडा प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यावर माझा भर राहील, असे चोप्राने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. गेल्या वर्षी झालेल्या डोहा डायमंडलीग अॅथलेटिक्स स्पर्धेत निरज चोप्राने 90 मी.चा टप्पा ओलांडला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.