For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नीना सिंह सीआयएसएफच्या पहिल्या महिला प्रमुख

06:03 AM Dec 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
नीना सिंह सीआयएसएफच्या पहिल्या महिला प्रमुख
Advertisement

यापूर्वी होत्या सीबीआयच्या संयुक्त संचालिका

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदाची जबाबदारी पहिल्यांदाच एका महिलेला सोपविण्यात आली आहे. राजस्थान कॅडरच्या 1989 च्या तुकडीच्या आयपीएस अधिकारी नीना सिंह यांना ही जबाबदारी मिळाली आहे. देशातील सर्व विमानतळे, दिल्ली मेट्रो आणि अन्य शासकीय भवनांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफकडे आहे. नीना सिंह यापूर्वी राजस्थान पोलीस विभागाच्या महासंचालिका राहिल्या आहेत.

Advertisement

नीना सिंह सध्या सीआयएसएफच्या विशेष महासंचालिका पदावर कार्यरत होत्या. 2021 मध्ये त्या सीआयएसएफमध्ये दाखल झाल्या होत्या. 31 जुलै रोजी त्या निवृत्त होणार असून तोपर्यंत त्या सीआयएसफ प्रमुखपदी असणार आहेत.

नीना सिंह यांनी 2013-18 दरम्यान सीबीआयच्या संयुक्त संचालिका म्हणून काम पाहिले आहे. यादरम्यान त्यांनी अनेक हायप्रोफाइल प्रकरणांचा तपास केला आहे. 2020 मध्ये त्यांना अतिउत्कृष्टता सेवा पदकाने गौरविण्यात आले होते.

2000 साली त्या राजस्थान महिला आयोगाच्या सदस्य सचिव म्हणून तैनात होत्या. यादरम्यान त्यांनी महिलांसाठी आउटरिच प्रोग्राम डिझाइन केला होता. यात आयोगाच्या सदस्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन महिलांशी संवाद साधत होत्या. या महिलांच्या समस्या ऐकून घेत त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न यामाध्यमातून झाला होता. नीना सिंह 2005-06 मध्ये मॅसाचुसेट्स इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसाठी एका प्रकल्पावर काम केले होते.

Advertisement
Tags :

.