नीना कुळकर्णी नाटकाच्या प्रयोगावेळी कोसळल्या अन्....
मुंबई
'असेन मी.... नसेन मी... ' या नाटकाच्या प्रयोगावेळी अचानक ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांची प्रकृती बिघडली. प्रयोग रद्द करण्याचा ही निर्णय झाला. तेवढ्यात नीना कुळकर्णी यांनी प्रयोग पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. आणि रंगभूमीप्रति निष्ठा राखत तो पूर्ण ही झाला. अशी माहिती नाटकाचे लेखक संदेश कुलकर्णी यांनी दिली.
या नाटकाचा पुढचा प्रयोग रद्द केल्यानंतर नीनाताईंच्या प्रकृतीची चौकशी करणारे, त्यांच्यासाठी प्रार्थना करणारे अनेक मेसेजेस प्रेक्षकांनी पाठविले आहेत. प्रेक्षकांचे हे अनन्यसाधारण प्रेम बघून भरून येते, असे लेखक संदेश कुलकर्णी म्हणाले.
नाटकाच्या प्रयोगावेळी नाट्यगृह प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. अशातच अचानक ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांची प्रकृती बिघडली. पोटातील संसर्गामुळे त्या आजारी होत्या. त्यांच्या अशक्तपण जाणवत होता. त्यामुळे त्यांच्या प्रकृती बरी नसताना प्रयोग करायचा की नाही. या विचारात सगळे होते. मात्र त्यांनी ठामपणे "खुर्चीत प्रेक्षक बसल्यानंतर प्रयोगत रद्द करायचा नाही", अशी भूमिका घेतली.