For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नीना गुप्तांना मल्याळी सीरिजमध्ये संधी

06:14 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
नीना गुप्तांना मल्याळी सीरिजमध्ये संधी
Advertisement

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता स्वत:च्या अभिनयामुळे चर्चेत असतात. नीना गुप्ता यांनी स्वत:च्या भूमिकांद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 1982 मध्ये स्वत:चा पहिला चित्रपट ‘आधारशिला’पासून 1994 पर्यंत ‘वो छोकरी’साठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकेपर्यंत, 90 च्या दशकात टीव्ही मालिका ‘सांस’सोबत एक अभिनेत्री तसेच दिग्दर्शिकेच्या स्वरुपात त्यांनी नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Advertisement

मधली काही वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्यावर नीना यांनी 2018 मध्ये बधाई हो या चित्रपटात मध्यम वयोगटातील गरोदर महिलेची भूमिका साकारत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकाविला होता. स्वत:च्या कारकीर्दीचा दुसरा टप्पा सुरू केल्यावर त्या अत्यंत व्यग्र राहिल्या. आता अभिनेत्रीने स्वत:च्या नव्या प्रोजेक्टचा खुलासा केला आहे.

पंचायत या सीरिजसाठी त्यांचे सध्या कौतुक होत ओह. एका महिला सरपंचाची भूमिका त्यांनी यात प्रभावीपणे साकारली आहे. नीना गुप्ता या आगामी काळात एका मल्याळी सीरिजमध्ये दिसून येणार आहेत. तसेच त्या ‘मेड इन इंडिया’ चित्रपटात रकुल प्रीत सिंहसोबत काम करणार आहेत.  नीना गुप्ता यांची मल्याळी सीरिज लवकरच डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. याचबरोबर ‘बा’ चित्रपटात त्या दिसून येणार आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.